इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी पदाचा गैरवापर असल्याचा आरोप करत आरपीआय चे बोंबाबोंब आंदोलन.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री रामराज कापरे यांच्या कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन.

इंदापूर: इंदापूर नगरपालिकेच्या वतीने इंदापूर येथील हिंदू स्मशानभूमी येथे शवदाहिनी चे काम चालू आहे सदरील काम माननीय जिल्हाधिकारी सो पुणे यांची प्रशासकीय मान्यता घेऊन सुरू आहे सदरील काम कोरोना महामारीच्या तिसऱ्या लाटे पूर्वी पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे असे मा.जिल्हाधिकारी सो यांचे आदेश आहेत या संधीचा फायदा घेऊन या बांधकामाचे ठेकेदार व इंदापूर नगर पालिकेचे मुख्याधिकारी रामराज कापरे व बांधकाम विभागातील संबंधित अधिकारी यांनी मिळून या बांधकामांमध्ये बोगस प्रकारचे कामकाज सुरू केले आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी वर्च्युअल मीटिंग द्वारे सदर काम प्राधान्याने करण्याच्या सूचना दिलेले आहेत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री रामराज कापरे हे आपल्या पदाचा गैरवापर करून या ठेकेदाराला मन मानेल त्या पद्धतीने काम करण्याची परवानगी देत आहेत याबाबत पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे संघटक सचिव शिवाजीराव मखरे व इंदापूर शहर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अमोल मिसाळ यांनी इंदापूर नगरपालिका नगर अभियंता श्री राऊत यांना वेळोवेळी बोगस होत असलेल्या कामाबाबत कळून सुद्धा त्यांनी याकडे पूर्ण दुर्लक्ष केले म्हणून त्यांचे लक्ष वेधण्यासाठी व या कामातील ठेकेदारावर कायदेशिर कारवाई करून त्याला टाळल्या यादीत टाकण्याच्या मागणीसाठी आज गुरुवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इंदापूर तालुक्याच्या वतीने मुख्याधिकारी रामराज कापरे यांच्या ऑफिस समोर त्यांच्या नावाच्या पाठीला पुष्पहार घालून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे जिल्हा संघटक सचिव शिवाजीराव मखरे इंदापूर तालुका सरचिटणीस राकेश कांबळे व इंदापूर शहर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष अमोल मिसाळ व इतर कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले जर या आंदोलनाची दखल घेतली नाही तर इथून पुढचे आंदोलन हे पुणे जिल्हाधिकारी यांच्यासमोर होईल असे शिवाजीराव मखरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.



इंदापूर तालुक्यातील चिंकारा हरीण शिकार प्रकरण सविस्तर आढावा खालील लिंक वर क्लिक करा.🦌🦌🦌🦌🦌🦌👇👇👇

https://youtu.be/bXXoCMMUxq0

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here