पूणे जिल्हा मध्यवर्ती बँक(PDCC)अधिकारी 5000 हजाराची लाच घेताना अटक.

पूणे जिल्हा मध्यवर्ती बँक(PDCC)अधिकारी 5000 हजाराची लाच घेताना अटक.

पुणे: पीक कर्ज मंजूर करण्यासाठी शेतकऱ्याकडे पाच हजारांची लाच मागणाऱ्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (पीडीसीसी) विकास अधिकाऱ्याला व वाडेबोल्हाई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सचिवाला पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली.पीडीसीसीच्या वाघोली शाखेत बुधवारी (ता. २२) ही कारवाई करण्यात आली.

दीपक रामचंद्र सायकर (वय ३८) आणि गोपीचंद दत्तात्रेय इंगळे (वय २७) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत एका ३३ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला पीक कर्ज हवे होते. हे कर्ज प्रकरण करण्यासाठी पीपीसीसीच्या वाघोली शाखेतील सायकर आणि वाडेबोल्हा्ई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचा सचिव इंगळे त्यांच्याकडे लाचेची मागणी करत होता.

परंतु, तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी विभागात धाव घेऊन तक्रार दाखल केली होती. १६ जुलै ते २२ जुलै दरम्यान या प्रकरणाची पडताळणी करण्यात आली. बुधवारी सापळा रचून सायकर याला पाच हजारांची लाच घेताना ताब्यात घेण्यात आले. विभागाचे उपअधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्रीराम शिंदे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.



        ठळक बातमी

महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरलेला इंदापूर तालुक्यातील चिंकारा हरीण शिकार प्रकरण पहा सविस्तर खालील लिंक👇 https://youtu.be/bXXoCMMUxq0

 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here