जनता एक्सप्रेस मराठी न्यूज दौंड प्रतिनिधी
अजय तोडकर मो.7776027968
यवत : मौजे उंडवडी ता.दौंड हद्दीतील 7/12 गट नंबर 1 ते 413 या जागेवर पीएमआरडीऐने ग्रीन झोन G-2 हे आरक्षण टाकलेले आहे. सदरचा ग्रीन झोन G-2 रद्द करून त्याऐवजी ग्रीन झोन G-1 तसेच रहिवासी झोन करावा अशी मागणी ग्रामपंचायत उंडवडी तर्फे करण्यात आली, त्याच बरोबर मेमाणेवस्ती, भोसलेवाडी, सौंदडवाडी, उंडवडी भौगोलिक दृष्ट्या निवासी क्षेत्र असून प्रत्येक वाडीवस्तीवर एक हजार मीटर रहिवाशी झोन करावा.
उंडवडी नदीकिनारी येणारा ग्रीन बेल्ट झोन रद्द करून त्याऐवजी ग्रीन झोन G-1 तसेच रहिवाशी झोन करावा. आराखड्यात दाखवलेल्या पूररेषा व वस्तुस्थितीतील पूररेषा यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत दिसून येते, पीएमआरडीएने प्रत्यक्ष पाणी करून नंतर पूररेषा निश्चित करावी.उंडवडी गावठाण ते पुणे सोलापूर महामार्ग पर्यंत रस्त्याचा शेती झोन काढून त्याऐवजी रहिवाशी झोन व कमर्शिअल झोन करावा.
उंडवडी मध्ये खडकवासला व पानशेत धरणाचे प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन झालेले असून गट नंबर 318, 304, 305, 306 हे पुनर्वसन गावठाण असल्यामुळे तिकडे आसपास मोठे निवासी क्षेत्र असल्यामुळे गावठाणा पासून 500 मीटर रहिवाशी झोन करावा. पीएमआरडीए कडे उंडवडी ग्रामपंचायतच्या वतीने सुनावणीच्या वेळेस सरपंच दीपमाला जाधव व उपसरपंच विकास कांबळे यांना सुनावणीच्या वेळेस उपस्थित राहण्यास ग्रामपंचायतीतर्फे मान्यता देण्यात आलेली आहे.
पीएमआरडीएने प्रत्यक्ष पाहणी न करता टाकलेल्या आरक्षणे ही भविष्यात गावकऱ्यांसाठी मोठा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा पीएमआरडीए कडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येणार आहे अशी माहिती उंडवडी गावच्या सरपंच दीपमाला जाधव यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील चिंकारा हरीण शिकार प्रकरण पहा खालील लिंक वर👇👇