वीर मराठी प्रोडक्शनसाठी राजवर्धन पाटील यांनी दिले वायरलेस माईक
इंदापूर प्रतिनिधी: समाजातील दुर्लक्षित तसेच उपेक्षित घटकावर प्रकाश टाकण्यासाठी इंदापुरातील महाविद्यालयीन युवकांनी एकत्रित येऊन ‘कपाळ’ या वेबसिरिजच्या माध्यमातून वीर मराठी प्रोडक्शनचे कार्य सुरू केले असून या युवकांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे यासाठी निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांनी बायो कंपनीचे वायरलेस माईक वीर मराठी या प्रोडक्शनसाठी दिले आहे.
राजवर्धन पाटील यांच्या हस्ते नुकतेच वीर मराठी प्रोडक्शनचे उदघाटन झाले होते. युवकांनी या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पुढे यावे त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी मदत जाहीर करण्याचे यावेळी त्यांनी जाहीर केले होते.राजवर्धन पाटील यांनी बायो कंपनीच्या वायरलेस माईकचे सेट वीर मराठी प्रोडक्शनचे सदस्य कुमार शिंदे, राहुल बिबे, प्रशांत मखरे यांच्याकडे सुपूर्त केले तसेच त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पहा इंदापुर तालुक्यातील चिंकारा हरीण शिकार प्रकरण.. यासाठी खालील लिंक 👇👇वर क्लीक करा.