शरद पवारांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी.. इंदापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह.

सध्या महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वातावरण चांगलं चाललेलं दिसून येते. अनेक मातब्बर नेते राष्ट्रवादी शरद पवार पक्षामध्ये येण्यास इच्छुक आहेत व काही मोठ्या नेत्यांनी प्रवेश सुद्धा केलेला आहे यातीलच एक नाव भाजपाचे हर्षवर्धन पाटील यांचे घेता येईल. हर्षवर्धन पाटील हे एक बलाढ्य नेते असून महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी आपलं कौशल्य दाखवले होते व त्यांना दांडगा अनुभवही आहे.नुकतेच भाजपमधून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने हर्षवर्धन पाटील यांची पार्लमेंटरी बोर्ड संसदीय मंडळा मध्ये नियुक्ती करण्यात आली आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिले आहे. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली असल्याची चर्चा आहे. उमेदवार निवडीच्या प्रक्रियेमध्ये ही त्यांचा समावेश असेल. त्यांच्या या निवडीमुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला असून या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व एकमेकांना पेढे भरून हा आनंद साजरा केला. इंदापूर शहर व ग्रामीण भागातही कार्यकर्ते आनंदी असल्याचे चित्र एकंदरीत या निवडीनंतर दिसून येत आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here