इंदापूर तालुक्यातील 39 वर्षाचा कार्याचा आढावा थोडक्यात मांडणे शक्य नाही कारण अफाट कार्य या संपूर्ण काळात आमचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हातून घडले आहे. इंदापूर अर्बन बँकेची स्थापना, दूधगंगा दूध उत्पादक संघ, निरा भिमा साखर कारखान्याची उभारणी, इत्यादी महत्त्वपूर्ण संस्था त्यांच्या माध्यमातून सुरू झाल्या. कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांनी 18 मार्च 1960 रोजी स्थापन केली होती. बाजारपेठ विकसित करण्यासाठी बाजार समितीच्या कार्य कक्षा वाढवण्याचे काम मा श्री हर्षवर्धन जी पाटील साहेब यांनी केले. इंदापूर येथे आंतरराष्ट्रीय कांदा निर्यात केंद्र उभारले, तालुक्यातील वाढते डाळिंब उत्पादन लक्षात घेऊन डाळिंब मार्केटची ही उभारणी झाली. भिगवण निमगाव केतकी वालचंदनगर बावडा या ठिकाणी उप बाजार समित्यांची स्थापना भाऊंनी केली.अत्याधुनिकतेने नटलेल्या या बाजार समित्या तालुक्यातील केळी,कांदा भुईमुग शेंग गुळ खाण्याचे पान यासाठी प्रसिद्ध आहेत त्यामुळे तालुक्यातील उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातही त्यांच्या कार्याचा ठसा पहावयास मिळतो या तालुक्याचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी 30 पेक्षा अधिक माध्यमिक शाळा 300 अंगणवाड्या वस्तीशाळा आयटीआय च्या नवीन कोर्सेसला मंजुरी अद्यावत विद्यार्थी वसतिगृहे, तसेच कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालयात अनेक कोर्सेस सुरू केले व शहाजीराव पाटील विकास प्रतिष्ठान संचालित पब्लिक स्कूल एस बी पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग व पॉलिटेक्निक तसेच फार्मसी कॉलेज सुरू करून शैक्षणिक संस्थांचे जाळे इंदापूर तालुक्यात उभा करण्याचे काम त्यांनी केले आहे. शिक्षणाच्या भगीरथाचा वारसा त्यांनी इंदापूर तालुक्यात निर्माण केला आहे.दुष्काळी तालुक्याला पाणी देणारे नेते म्हणूनही त्यांचा उल्लेख होतो.1995 मध्ये लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना खडकवासला धरणातून इंदापूर तालुक्याला मिळणाऱ्या पाण्याचा वाटा वाढवून घेतला. निरा डाव्या कालव्याचे पाणी इंदापूर तालुक्याला मिळवण्यासाठी शासन दरबारी इंदापूरची वकील केली तालुक्यातील उजनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना उपसा सिंचन योजनेद्वारे मुबलक पाणी देण्यासाठी सतत प्रयत्न करणारे हर्षवर्धनजी पाटील साहेब आहेत. शेटफळ तलावाची उंची वाढवून अधिक क्षेत्र ओलीताखाली आणण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले आहे. नीरा नदीवर पीठेवाडी, बोरटवाडी, निरवांगी, निमसाखर, वालचंदनगर, चिखली व भीमा नदीवर टणू, नीरा- नरसिंहपुर येथे बंधाऱ्याची कामे पूर्ण झाली आहेत. तसेच सुरवड वडापुरी अवसरी बेडसिंग बाभुळगाव गलांडवाडी नं २ भाटनिमगाव या भागात उपसा सिंचन योजनेचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गे लावले आहेत. निमगाव येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधून कृषी क्षेत्राला नंदनवन बनवण्याचे कार्य हर्षवर्धन पाटील साहेबांचेच.त्याचबरोबर तालुक्याला विज मिळावी म्हणून लोणी देवकर,काटी, घोलपवाडी, कालठण नंबर एक, बावडा, शिरसोडी, कांदलगाव, भाटनिमगाव, बाभूळगाव या ठिकाणी सबस्टेशन कारव्यान्वित करण्याचे श्रेय हे हर्षवर्धन पाटील साहेबांना जाते.अशाप्रकारे एक काम करणारा,लोकांचे दुःख दूर करणारा, लोक अपेक्षांना न्याय देणारा, कणखर नेता इंदापूर तालुक्याला लाभला आहे एक सुसंस्कृत नेता म्हणून यांचा परिचय महाराष्ट्राच्या राजकारणाला आहे.सत्तेसाठी नाही तर समाजासाठी झटणारा नेता अशी त्यांची ख्याती सर्वदूर आहे. त्यांचा हा राजकीय आणि सामाजिक प्रवास महाकाव्यातील धिरोदात्त नायकाप्रमाणे उज्वलतेकडे घेऊन जाणारा आहे. त्यांच्या या कार्याचा आढावा ६०व्या वाढदिवसानिमित्त घेत असताना कार्यकर्त्यांमध्ये नव संजीवनी भरेल असा मला विश्वास वाटतो.गोरगरीबांच्या आशीर्वादाचा संचय आणि कर्तुत्वाची उभारी मा. श्री. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्याकडे आहे. इंदापूरचे ग्रामदैवत श्री. इंद्रेश्वराला या प्रसंगी प्रार्थना की आमच्या या नेत्याला उदंड आयुष्य लाभू दे. त्यांना वाढदिवसाच्या या शब्दरूपी कोटी कोटी शुभेच्छा..