प्रतिनिधी :प्रवीण पिसे
दानात दान श्रेष्ठ दान कोणतं असेल तर जे दान समाजोपयोगी आहे, तेच खरे श्रेष्ठ दान होय. मोठं दान देण्यासाठी मन ही तितकंच मोठं असावं लागतं. आणि असंच मोठ्या मनाने खूप मोठं सत्पात्री दान दिलं आहे सध्या बारामतीस्थित वास्तव्यास असणारे बोरी गावचे सुपुत्र श्री.रामचंद्र कृष्णाजी कवितके (गुरूजी) यांनी.श्री.कवितके गुरूजी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक,यांनी बारामती नगर परिषद बारामती चे शाळा नंबर २ व ५ या शाळांमध्ये उत्कृष्टरित्या काम करून शाळेचे नाव लौकिकास आणले.आजपर्यंत अनेक सेवाभावी संस्था, अनाथ आश्रम, अनाथ मुले गोरगरीब विद्यार्थी यांना मदत केलेली आहे. त्याचीच पुण्याई म्हणून प्रथम मुलगा डॉक्टर व सुनबाई डॉक्टर द्वितीय मुलगा आयटी इंजिनियर पत्नी प्राथमिक शिक्षिका तृतीय मुलगा व सुनबाई अमेरिका येथे एका कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांनी आज पर्यंत शाळेसाठी कार्पेट व मुलांना शुद्ध पाणी पिण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्रणा दिलेली आहे.
बारामती नगरपरिषद प्राथमिक शाळा स्वच्छ सुंदर सक्षम शाळा प्रतियोगिता चंदूकाका सराफ यांच्या वतीने तयार केलेले पथक सलग पाच वर्ष प्रथम क्रमांक काचे बक्षीस प्राप्त करून शाळेचा नावलौकिक केले. या कामासाठी परीक्षक म्हणून पाच शिक्षण तज्ञ शिक्षकांची नेमणूक केली होती.त्यांनी अचानक शाळेत भेट देऊन तपासणी करून आपले अभिप्राय नोंदविले होते.यावरून त्यांची शिक्षण व शाळेविषयीची तळमळ लक्षात येते.
श्री.कवितके गुरूजींचे प्राथमिक शिक्षण बोरीसारख्या खेडेगावात शिक्षण झाले. माध्यमिक शिक्षण छत्रपती हायस्कूल भवानीनगर येथे पूर्ण केले. सांगली जिल्ह्यातील तासगाव या ठिकाणी डी एड शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. पण शिक्षण अधिक मिळावे म्हणून ते सतत कार्यरत राहिले. नोकरी करत असताना त्यांनी बी.ए.,एम.ए. पदवी धारण करून बी. एड. शिक्षण पूर्ण केले. त्यांनी आपल्या तीनही मुलांना उच्च शिक्षण दिले. गावच्या कृतज्ञेच्या अन् उपकाराच्या ओझ्यातून अल्प अंशाने मुक्त होण्यासाठी वरील प्रमाणे शाळेस भरघोस अशी देणगी दिलेली आहे. त्याबद्दल संपूर्ण कवितके परिवाराचे बोरी गावचे सरपंच,उपसरपंच, सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा परिषद शाळा बोरी, समस्त ग्रामस्थ बोरी, यांच्या तर्फे हार्दिक अभिनंदन करून सत्कार करण्यात आला.