इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्यूनि.कॉलेजच्या विज्ञान विभागात “गुरुपौर्णिमा “साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इन्स्पेक्शन ऑफिसर श्री.मदन हराळ पाटील होते. या प्रसंगी प्राचार्य संजय सोरटे, पर्यवेक्षक प्रा.औदुंबर चांदगुडे ,विभागप्रमुख प्रा.भाऊ झगडे सांस्कृतिक विभागातील प्रा.नवनाथ गाडे व प्रा.ज्योती सावंत, सर्व शिक्षक – शिक्षिका विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. प्रिया पवार हिने केले.यावेळी सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.या प्रसंगी हराळ पाटील म्हणाले की , पुस्तक माझे गुरू झाले की ध्येयपूर्ती होतेच म्हणून विद्यार्थ्यांनी खूप वाचन करावे . स्वतःचे व आई वडिलांचे नाव उज्ज्वल करावे. गुरू हा विद्यार्थ्यांचा परमेश्वर असतो.प्राचार्य संजय सोरटे म्हणाले की चंद्र सूर्य असे पर्यंत गुरू शिष्य नाते अखंड रहणार आहे.आपली संस्कृती ,परंपरा खूप महान आहे.या वेळी विद्यार्थ्यांनी फलक लेखन करून रांगोळी काढून,पताका,तक्ते लावून ,फुल पाकळ्याच्या पायघड्या घालून आकर्षक पद्धतीने वर्ग सजवले होते. सूत्रसंचालन कु. दीक्षा कांबळे व सायली काळे यांनी केले तर आभार कु.निकिता कांबळे यांनी मानले.