“मराठा बांधव मुंबईत आले की तुम्ही आणले? मुख्यमंत्र्यांना सवाल करीत इंदापूर शहरप्रमुख अशोक देवकर यांचा राजीनामा.

मराठा आरक्षणाचा लढा उभारल्यानंतर मराठा समाज हा लाखोंच्या संख्येने मुंबईत जमा झाला व त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक पाऊल उचलले परंतु यानंतर मात्र महाराष्ट्रात ठीक ठिकाणी ओबीसी समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे याचाच एक भाग इंदापूर तालुक्यात पाहिला मिळाला. इंदापूर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे इंदापूर शहरप्रमुख जे शिवसेनेमध्ये खूप सक्रिय होते त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री यांनी आमच्या समाजावर अन्याय करत मराठा समाजाला आरक्षण मिळण्याकरता सकारात्मक पावले उचलले आहे आणि म्हणून मी शिवसेना शहरप्रमुखाचा राजीनामा देत आहे असे अशोक देवकर यांचे म्हणणे आहे.जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना अशोक देवकर म्हणाले की,”मुख्यमंत्र्यांनी समाज बांधवांचा घात केलेला आहे, ओ.बी.सी. तुन आरक्षण दिलेले आहे. मी पण एक ओ.बी.सी आहे त्यामुळे मी राजीनामा देत आहे. शिवसेना जी आहे ही शिवसेना जातीच राजकारण करणारी शिवसेना आहे.त्यामुळे जे कोणी ह्या शिदे गटात ओ.बी.सी चे बंधु व भगिनी आहेत त्यानी सर्वानी ह्या मिदे गटाचा राजीनामा द्यावा व आपला ओ.बी.सी.चा मुख्यमंत्री भुजबळ साहेब कसे होतील हे बघाव. पुढे ते मुख्यमंत्री शिंदे साहेबांना उद्देशून म्हणाले की,”शिदे साहेब जर मराठा बांधव मुंबई ला आले की तुम्हीच आणले हे सर्वाना माहीतीय ओ.बी.सी बांधव लवकरच मुंबई ला येणार त्या वेळेस तुम्हाला समजेल ओ.बी.सी ची ताकद काय आहे”.अशा पद्धतीने एकंदरीतच आता राजीनाम्याचे सत्र महाराष्ट्रातून निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि याची सुरुवात महाराष्ट्रातून पहिल्यांदाच इंदापूर तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाच्या शहरप्रमुखामार्फत झालेले आहे हे मात्र नक्की.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here