इंदापूर: क्रीडा व युवक सेवा संचालानलय महाराष्ट्र राज्य ,अंतर्गत घेण्यात आलेल्या विभाग स्तरीय सुरपाठ स्पर्धा या जिजाऊ गुरुकुल सैनिक स्कूल खांडवी ता.बार्शी या ठिकाणी घेण्यात आल्या होत्या. यामध्ये विविध जिल्ह्यातून विविध शाळेतील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी मधील 19 वर्ष मुलांमधील सेमी फायनल मॅच नगर जिल्हा पाच गुणांनी विजयी तर फायनल मॅच सोलापूर जिल्हा सोबत अत्यंत चुरशीची च्या लढाईत खेळाडूंनी द्वितीय क्रमांक प्राप्त केला.
सांघिक कामगिरीमुळे व शिस्तबद्धतेमुळे सुरपाठ (आट्या-पाठया) स्पर्धेत यश- श्रीमंत ढोले सर
सांघिक कामगिरीमुळे व शिस्तबद्ध खेळामुळे या स्पर्धेत आपल्या शाळेचा द्वितीय क्रमांक आला असून यामध्ये आणखी सराव वाढवून व तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करत पुढील वर्षी प्रथम क्रमांक आणण्याचा मानस या खेळाडूंनी केला आहे.शाळेकडून त्यांना योग्य मार्गदर्शनही देण्यात येणार आहे.आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी केलेल्या कामगिरीचा आनंद वाटतो असे मत संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांनी व्यक्त केले त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंची त्यांनी अभिनंदनही केले.या नेत्रदीपक कामगिरी बद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.श्रीमंतजी ढोले (सर),उपाध्यक्ष सौ.श्री.चित्रलेखा ढोले मॅडम,सचिव श्री हर्षवर्धनजी खाडे, मुख्य सल्लागार श्री प्रदिपजी गुरव साहेब तसेच प्राचार्य श्री.राजेंद्र सरगर सर,संस्थेचे प्रशाशक श्री.गणेशजी पवार सर यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.तसेच यांना क्रिडा विभाग प्रमुख प्रशिक्षक श्री शिवराज तलवारे सर, श्री.अविनाश कोकाटे सर,यांचे मार्गदर्शन लाभले यांचेही संस्थेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
Home Uncategorized जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संस्थेतील विद्यार्थ्यांचे विभाग-स्तरीय सुरपाठ (आट्या-पाठया ) स्पर्धेत घवघवीत...