बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या अत्यंत निकटवर्ती समजल्या जाणाऱ्या शोभा देविदास माने यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते शहा संस्कृतिक भवन येथे त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. शोभा देविदास माने या भांडगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान उपसरपंच आहेत .त्यांचा पहिल्यापासूनच राजकारणाबरोबर सामाजिक कामातही मोठे योगदान असते. सर्वसामान्य लोकांना त्यांनी आत्तापर्यंत न्याय देण्याचे काम केले असून त्यामुळे त्यांचा भांडगाव व भांडगाव पंचक्रोशीतील महिलांमध्ये दांडगा जनसंपर्क निर्माण झाला आहे. आणि हेच ओळखून सुप्रियाताई सुळे यांनी त्यांना महिला आघाडीच्या उपाध्यक्षपदी विराजमान केले आहे. दि. 23 नोव्हेंबर रोजी इंदापूर येथे शहा संस्कृती भवन कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात अनेक नवनियुक्त पदाधिकारी त्यांना नियुक्तीपत्र खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी मा. जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रवीण माने, सामाजिक न्याय विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, तालुकाध्यक्ष तेजसिंग पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल भिसे, रेहाना मुलांनी, तालुका महिला अध्यक्ष छायाताई पडसळकर व इत्यादी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजशी बोलताना शोभा माने म्हणाल्या की ,पक्ष श्रेष्ठींनी जी माझ्यावर जबाबदारी दिली आहे ती जबाबदारी मी यशस्वीरित्या पार पाडेल .तालुक्यातील महिलांना संघटित करण्याचा प्रयत्न करेन आणि आपल्या पक्षाची ताकद जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करेन ,त्यांच्या या नियुक्तीमुळे त्यांच्यावर फोनद्वारे, भेटून शुभेच्छा चा वर्षाव होताना दिसत आहे
Home Uncategorized राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षपदी शोभा देविदास...