ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करत निमगावकरांनी गाव बंद ठेवीत जरांगे पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास केले जोडे मारो आंदोलन.

निमगाव केतकी:सकल ओबीसी समाज बांधवांच्या वतीने ओबीसी आरक्षण बचाव व छगन भुजबळ यांच्या विषयी सोशल मिडीयावर अश्लील बेताल वक्तव्य यांच्या निषेधार्थ निमगाव केतकी गाव दिवसभर बंद ठेवत सकाळी श्री संत सावतामाळी चौकात निषेध सभा आयोजित केली होती. यावेळी एकच पर्व ओबीसी सर्व, भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, ओबीसी एकजुटीचा विजय असो या घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.आरक्षणाच्या मुद्द्यावरून जातीय तेढ ओबीसी नेते छगन भुजबळ हे निर्माण करीत नसून मराठा आरक्षण मागणीचे आंदोलक मनोज जरांगे पाटील हेच करत आहेत असा पलटवार करत आज निमगाव केतकी येथे ओबीसी समाज बांधवांनी जरांगे पाटील यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यास जोडो मारून त्यांचा निषेध व्यक्त करत आंदोलन केले.ओबीसींच्या आवाहनास प्रतिसाद देत काल ग्रामस्थ, व्यापारी, दुकानदार यांनी गाव दिवसभर कडकडीत बंद ठेवून प्रतिसाद दिला.मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यास तीव्र विरोध करत यावेळी आंदोलकांनी समाजामध्ये जरांगे पाटील हेच तेढ निर्माण करत आहेत. त्यांच्या दोन महिन्याच्या बेताल वक्तव्यानंतर असह्य झाल्यानंतर भुजबळ यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे याचा राग त्यांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे ते खालच्या पातळीवर जाऊन भुजबळ यांच्यावरती चिखल फेक करण्याचा प्रयत्न करत आहेत .आम्ही हे खपवून घेणार नाही. तुम्हाला आरक्षण भुजबळ देणार नाहीत ते तुम्हाला संविधान पद्धतीने मिळणार असल्याने यापुढे भुजबळ यांच्या वरती टीका करू नका. सध्या कुणबीचे दाखले बोगस पद्धतीने देण्यास काम सुरू आहे. ते थांबले पाहिजे. तुम्हीच जाळपोळ करता सरकारला वेठीस धरता अशा भावना यावेळी वक्त्यांनी व्यक्त केल्या.लवकरच निमगाव केतकी येथील श्री संत सावता माळी चौक या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी इंदापूर तालुका माळी परिषदेचे अध्यक्ष ॲड.कृष्णाजी यादव, माजी सभापती अंकुश जाधव, दत्तात्रय शेंडे, माजी सरपंच दशरथ डोंगरे, सुवर्णयुग ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र चांदणे, माजी उपसरपंच तुषार जाधव, सावता परिषदेचे संघटक संतोष राजगुरू, कर्मयोगी चे संचालक राहुल जाधव, प्रा. अमर बोराटे, मागासवर्गीय समाजाचे दत्ता मिसाळ, वाणी समाजाच ॲड.रोहित लोणकर, मुस्लिम समाजाचे सिकंदर मुलाणी, नाभिक समाजाचे विक्रम जगताप, धनगर समाजाचे कुंडलिक कचरे, किरण म्हेत्रे, बबन खराडे, तुषार शेंडे, संतोष गदादे, संतोष हेगडे, ॲड.सुभाष भोंग, ॲड. सचिन राऊत शशिकांत शेंडे यांची भाषणे झाली.यावेळी इंदापूर अर्बन बँकेचे अध्यक्ष देवराज जाधव, कर्मयोगी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माऊली बनकर, माजी उपसरपंच तात्यासाहेब वडापुरे, केतकेश्वर पतसंस्थेचे अध्यक्ष गोरख आदलिंग, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष दत्तात्रय चांदणे, संदीप भोंग, माणिक भोंग, राजू जठार, संजय राऊत, मारुती भोंग, महेश जठार, महेश भोंग, राजू भोंग, कोंडीबा भोंग यांच्यासह ओबीसी बांधव उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here