इंदापूर:ओबीसींना दिशा देणारा व मराठा समाजाला कुणबी दाखल्याचा आधार घेऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करून ओबीसी प्रवर्गातील समाजावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी इंदापूर येथे 9 डिसेंबर रोजी विद्यमान अन्न नागरी पुरवठा मंत्री व ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी महामेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती ओबीसी शिष्टमंडळाचे प्रमुख पांडुरंग तात्या शिंदे यांनी दिली. पांडुरंग तात्या शिंदे यांच्या नेतृत्वाखाली इंदापूर तालुक्यातील वीस पदाधिकाऱ्यांनी नुकतीच ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ यांची मुंबई येथे जाऊन भेट घेतली व 9 डिसेंबर ही मेळाव्याची तारीख फिक्स केली.हा महामेळावा महाराष्ट्र भर ओबीसींना दिशा देणारा ठरेल असे पांडुरंग तात्या शिंदे यांनी सांगितले.आज ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ यांनी तब्बल १ तास इंदापूर तालुक्यातील या शिष्टमंडळाची चर्चा केली व पुढील दिशा काय असेल आणि कोणत्या पद्धतीने आरक्षण वाचवले पाहिजे याबद्दल मार्गदर्शन केले.9 डिसेंबर रोजी जो महामेळावा आयोजित केला आहे या महामेळाव्यास लाखो ओबीसी समाजातील बांधव उपस्थित राहून आपल्या ओबीसी समाजाच्या एकजुटीचे दर्शन घडवणार आहेत असे ओबीसी नेते पांडुरंग तात्या शिंदे यांनी सांगितले.यावेळी छगन भुजबळ यांना भेटण्यासाठी इंदापूर तालुक्यातून प्रामुख्याने पांडुरंग(तात्या)शिदे,बाळासाहेब व्यवहारे,तुकाराम करे,गणेश घुगे कुर्डूवाडी,पोपट पवार,सागर व्यवहारे,अशोक देवकर,गणेश जाधव,हानीप बेपारी,सागर रायकर,पंकज राऊत,संतोष राऊत,मंगेश वाघमोडे,पोपट शिंगाडे,पप्पु व्यवहारे,विनोद मखरे,राहुल बनसुडे,बालाजी ढगे,अनिल लडकत,राहुल देवकर,सुधीर गाडेकर इत्यादी उपस्थित होते.