अकलूज: रोजच्या धगधगीच्या जीवनात आणि रोजच्या व्यापामध्ये आपण खरे जीवन जगण्याचे विसरतो परंतु जुन्या आठवणी आणि जुने मित्र भेटले की जीवन जगण्याचा आनंद हा वेगळाच निर्माण होतो. त्यातही पुरुष मंडळी एकमेकांना वेगवेगळ्या कारणातून भेटतच असतात परंतु स्त्रियांचे मात्र अवघड असते मग शाळा संपल्यानंतर किंवा शाळेतून बाहेर पडल्यानंतर पुन्हा भेट होईल का? याची मात्र शाश्वती नसते. अशा परिस्थितीत काहीतरी कारण काढून महिला विद्यार्थिनींनी एकमेकांना भेटावं ही कल्पना सुचली ती कन्या प्रशाला यशवंतनगर येथील सन 1994/95 विद्यार्थिनींना…सर्व व्याप बाजूला होऊन एक दिवस वेळ काढून आपण पुन्हा भेटायचं आणि आपल्याबरोबर त्यावेळेसचे शिक्षकही असावेत त्यामुळे काही जुन्या विद्यार्थिनींनी पुढाकार घेऊन सर्व विद्यार्थिनींचे नंबर मिळवले व शिक्षकांचेही नंबर मिळवले आणि ठरलं पुन्हा एकदा भेटायचं.. काल कन्या प्रशाळेमध्ये तब्बल २५ वर्षांनी ८ शिक्षक आणि २३ विद्यार्थिनी एकत्र आल्या. यावेळी गोडसे सर शिंदे सर ,चव्हाण सर ,काशीद सर, सय्यद मॅडम, पवार मॅडम, अभंगराव मॅडम, शेख मॅडम यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात झाली. ज्या शिक्षकांनी घडवलं त्या शिक्षकांचा शाल,श्रीफळ,पुष्पहार व भेटवस्तू देऊन त्यांचे आभार मानत त्यांना सन्मानित करण्यात आले.त्याचबरोबर ज्या शाळेत शिकलो त्या शाळेला भेट वस्तू देण्यात आली. सर्व विद्यार्थिनींनी आपला परिचय सांगितला यामध्ये कोणी डॉक्ट, शिक्षिका,शासकीय अधिकारी, समाजसेविका, नोकरी, मेडिकल, राजकारण, तर कोणी हाउसवाइफ म्हणून काम करत होत्या. आपल्या आवडत्या सर्व शिक्षकांसाठी विद्यार्थिनी दिवाळीचे फराळ घेऊन आल्या होत्या. शिक्षकांबरोबर डब्यातील लाडू,चिवड्याचा आनंद घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला.त्यानंतर सर्वांनी मिळून स्नेहभोजन केले व तब्बल २५ वर्षानंतर भेट झाली म्हणून केक कापून आनंद साजरा केला.पंचवीस वर्षानंतर एकत्र आल्यामुळे सर्व विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद हा पाहिला मिळाला यापुढेही आपण असेच भेटूत राहू असा संकल्प सर्व विद्यार्थ्यांनी केला व शिक्षक आणि विद्यार्थी यांनी सामूहिक ग्रुपचा फोटो घेतला व कार्यक्रम संपला.
Home Uncategorized तब्बल 25 वर्षानंतर कन्याप्रशाला यशवंतनगर येथे 1994/95 वर्षीच्या बॅचचे स्नेह संमेलन उत्साहात...