सामाजिक बांधिलकी जपत भावी नगरसेवक अनिल अण्णा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूरमध्ये होणार भव्य रक्तदान शिबिर.
इंदापूर शहरांमध्ये सामान्य जनतेचा बुलंद आवाज त्याचप्रमाणे सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावून जाणारा “आण्णा” म्हणजे आजच्या युगातील खरा समाजसेवक. समाजातील छोट्या छोट्या घटकांपासून ते मोठमोठ्या पुढार्यांची(NCP+BJP) सर्वांची मने जिंकण्यात यशस्वी झालेला अनिल अण्णा पवार.सामान्य लोकांची कामे करण्याची पद्धत ही अनोखीच…तालुक्यातील कोणत्याही व्यक्तीचे शासकीय किंवा वैयक्तिक काम असेल तर हातातील काम सोडून त्या व्यक्तीचे काम केल्यावरच समाधान मानत आयुष्य जगणारा हा अनिल अण्णा पवार यांचा उद्या वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस सत्कर्मी लाभावा म्हणूनच दरवर्षीप्रमाणे अनाठाई खर्च न करता सामाजिक उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्याचे अनिल अण्णा पवार यांनी याही वर्षी ठरवले.इंदापूर शहरामध्ये ‘आमचे मेंबर’ या नावाने सुप्रसिद्ध असलेले व्यक्तिमत्व अनिल अण्णा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त” आमचे मेंबर मित्र परिवार” यांच्यावतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले असून हे रक्तदान शिबिर उद्या दिनांक 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 6 च्या दरम्यान होणार असल्याचे अनिल अण्णा पवार यांनी सांगितले. हे रक्तदान शिबिर बाबा चौकातील वडार गल्ली मध्ये समाज मंदिरात होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.इंदापूर शहरातील सर्वांचे आवडते व्यक्तिमत्त्व म्हणून अनिल अण्णा पवार यांच्याकडे पाहिले जाते कारण अनिल अण्णा पवार यांचे आमचे मेंबर मित्र परिवार हा ग्रुप सामाजिक उपक्रमात व मदतीस नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. समाजातील गरजू लोकांना हवी ती मदत करण्यात अनिल आण्णा पवार कुठेच कमी पडत नाहीत अशी भावना इंदापूरकरांमध्ये बोलले जात आहे. कोरोना च्या काळामध्ये अनिल अण्णा पवार यांनी समाजासाठी केलेली कामगिरी ही सध्या चर्चेचा विषय बनत आहे कारण ज्यावेळी कोरोनाचा कहर वाढलेला होता.त्यावेळी गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तू चे किट वाटप असेल किंवा हॉस्पिटल उपलब्ध करून देणे,अगदी गरजूंना पैशाची मदत करणे असेल या सर्व गोष्टी स्वतः अनिल आण्णा यांनी केल्या होत्या. एकाद्या गरीब कुटुंबातील व्यक्तीची मयत झाले असेल तर अनिल आण्णा त्या परिवाराला हवी ती मदत करत आसल्याचे दिसून आले होते..गेल्या कित्येक वर्षापासून समाजकारणाच्या माध्यमातूनच लोकांची सेवा करण्यात करण्यात त्यांना विशेष आनंद होतो असे त्यांचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आणि या समाजकारणाच्या भावनेतूनच उद्या रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे हे समजून अनावश्यक खर्च टाळून आमचे मेंबर मित्रपरिवाराला सूचना करून रक्तदान शिबिराचे अनिल अण्णा पवार यांनी केली आहे.उद्या होणारे या कार्यक्रमात पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे शहर उपाध्यक्ष दयानंद इरकल, प्रवीण माने ,राजवर्धन पाटील,नगराध्यक्षा अंकिता शहा,भरतशेठ शहा,राहुलजी मखरे,विशाल बोंद्रे,महादेव सोमवंशी, स्वप्नील सावंत, रमेश पवार, रविराज पवार, राजकुमार धोत्रे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून घेतलेल्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक इंदापूरकरांमध्ये मध्ये नक्कीच असणार यात शंका नाही.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री भाजपा नेते हर्षवर्धन पाटील व शुभहस्ते माजी मंत्री,विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे आहेत,तसेच राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती प्रदीपदादा गारटकर (रा. काँ. पुणे जिल्हाध्यक्ष) , दयानंद भाऊ इरकल ( पुणे शहर उपाध्यक्ष रा. काँ) , प्रवीण भैय्या माने( मा. सभापती जि. प. पुणे), अॅड. राहुल मखरे( राष्ट्रीय महासचिव बहुजन मुक्ती पार्टी) , राजवर्धन दादा पाटील (संचालक नीरा भीमा सह. सा. का.), अंकिता ताई शहा मा.नगराध्यक्ष इंदापूर न पा), श्रीकांत पाटील (तहसीलदार इंदापूर तालुका), दिलीप पवार( पोलीस निरीक्षक इंदापूर),रामराजे कापरे (मुख्याधिकारी इंदापूर नगरपरिषद), भरत शेठ शहा व्हा.चेअरमन कर्मयोगी शं. पा. सह. सा. कारखाना), अशोक इजगुडे (मा. नगराध्यक्ष इंदापूर न. पा) , मधुकर भरणे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर), प्रकाश पवार (सहाय्यक पोलीस निरीक्षक इंदापूर), रमेश पवार (दुय्यम निबंधक माळशिरस), महादेव सोमवंशी (शहर प्रमुख शिवसेना इंदापूर), साधू देवकर (उपसरपंच ), गणेश पाटील (युवा उद्योजक भिमानगर), कैलास गवळी (कार्याध्यक्ष त्रिदल माजी सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य), राम भैय्या गायकवाड(ए.आर. फाउंडेशन सं. अध्यक्ष म. राज्य), दत्ता गायकवाड (संचालक मकाई सह. सा. का. लि. जिंती), रविराज पवार (तालुकाध्यक्ष माजी सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य),हे मान्यवर उपस्थित राहणार असून संध्याकाळी आठ वाजता भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले.सदर कार्यक्रम वडार गल्ली, बाबा चौक (समाज मंदिर),इंदापूर या ठिकाणी आहे.कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आमचे मेंबर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले.
आरोग्य शिबिरासाठी इंदापूर क्रेटिकेअर सेंटर- हृदय व सर्व रोग निदान ,डॉ. एल. एस. कदम हॉस्पिटल बाल रोग निदान, डॉ. मगर कृष्णदृष्टी नेत्र रुग्णाल मोतीबिंदू व नेत्र तपासणी, राधाकृष्ण हॉस्पिटल डॉ. राजापुरे अस्थिरोग निदान, कृष्णा हॉस्पिटल डॉ. वणवे अस्थिरोग निदान, स्मिअर पॅथालॉजी लॅब- मोफत निदान कार्ड वाटप, रक्तातील साखर व हिमोग्लोबिन तपासणी करण्यासाठी वरील वैद्यकीय सेवेतील अनुभवी डॉक्टर व त्यांचे पथक उपस्थित असणार आहेत.तसेच मोफत निदान कार्ड वाटप अकलूज, बारामती, पंढरपूर,माढा, कुर्डूवाडी, बार्शी, भिगवण, दौंड, करमाळा, नातेपुते, टेंभुर्णी निरोगी आरोग्य रोग तपासणीसाठी निदान कार्ड प्रत्येक कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येकासाठी या योजनेखाली विविध प्रकारच्या सवलती तपासणी करण्यात येणार आहे.