कुंजीरवाडी, जि. पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय, पुणे येथील कृषिदूतांनी आंतराष्ट्रीय भरड धान्य वर्ष 2023-24 कार्यक्रम ग्रामीण सर्वांगीण विकास विदयलाय, कुंजीरवाडी या शाळेमध्ये साजरा करण्यात आला. कृषिदूतांनी या कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना भरड धान्य विषयी माहिती, फायदे व जणनागृती केली.भरड धान्याचे वैशिष्ठे सांगून विविध पदार्थ दाखवण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन कृषिदूतांमध्ये सुरज बदे, आफताब आतार, शुभम चौगुले, रोहन चव्हाण, शंभुराजे बुधवंतराव, प्रज्वल जाधव, रोहन आढाव, गणेश चंदनकर, तुषार भोसले, संभाजी भोसले, अथर्व औटी, सोमेश आजबे यांनी केले. यामध्यें विद्यालयाचे मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. तसेंच कृषी महाविदयालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. डी. मासाळकर . कार्यक्रम समन्वयक डॉ.व्ही. जे. तरडे व केंद्र प्रमुख डॉ. आर. डी. बनसोड, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. एस कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.