हर्षवर्धन पाटील यांचे भीमेवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवल्याबद्दल शेतकऱ्यांनी मानले आभार.

बांधाऱ्यांमध्ये पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान
इंदापूर :भीमा नदीवरील भाटनिमगाव, टणू व शेवरे या बंधाऱ्यांमध्ये शासनस्तरावर सतत पाठपुरावा करून पाणी अडवल्याबद्दल नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांनी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची शहाजीनगर येथे भेट घेऊन गुरुवारी (दि.5) आभार व्यक्त केले.
भाटनिमगाव, टणु व शेवरे हे बंधारे ढापे टाकून अडवणेसंदर्भात हर्षवर्धन पाटील हे सोलापूरचे तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सतत संपर्कात होते. त्यानुसार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रयत्नामुळे सदरचे बंधारे ढापे टाकून अडवण्यात आले आहेत. या बांधऱ्यांमध्ये पाणीसाठा होईपर्यंत हर्षवर्धन पाटील सातत्याने लक्ष ठेऊन होते. दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा चांगला उपलब्ध झाल्याने भीमा नदी काठच्या गावातील जनावरांच्या चाऱ्याचा, पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे, अशी माहिती सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखान्याचे माजी उपाध्यक्ष सुरेश मेहेर, निरा भिमा कारखान्याचे संचालक दादासाहेब घोगरे, भैरवनाथ सुरवड-भांडगाव पाणीपुरवठा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष दत्तात्रय घोगरे यांनी यावेळी दिली.
भीमा नदीकाठच्या नीरा नरसिंहपूर, टणु, पिंपरी बु.,गणेशवाडी, बावडा, वकीलवस्ती, भांडगाव, सुरवड, भाटनिमगाव, अवसरी, बेडसिंग, वडापुरी गावच्या परिसरातील शेतकरी बांधवांनी हर्षवर्धन पाटील यांचा याप्रसंगी सत्कार करून आभार व्यक्त केले. यावेळी निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, उदयसिंह पाटील, दत्तात्रय शिर्के, प्रकाशराव मोहिते, संजय बोडके, दत्तात्रय ताटे देशमुख, शरद जगदाळे पाटील, साहेबराव घोगरे, शिवाजीराव कोरटकर, शिवाजी पेंडवळे, अंकुश गायकवाड, शांतीलाल सावंत, सूर्यकांत फडतरे, सुदाम मोरे, राजेप्रताप शिंदे, सुरेश यादव, नागनाथ बनसुडे, दशरथ घोगरे, नामदेव घोगरे, शंकर घोगरे, विठ्ठल घोगरे, वैजनाथ घाडगे, संतोष घोगरे आदी उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here