पुणे कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतांकडून पिकांवर किटकनाशके फवारणीचे प्रात्यक्षिक

कुंजीरवाडी….पुणे जिल्ह्यातील कुंजीरवाडी गावामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषि महाविद्यालय,पुणे कृषिदुतांनी ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषि औदयोगिक कार्यानुभव कार्यक्रम व वनस्पती रोग शास्त्र विभागा अंतर्गत किटकनाशके फवारणीचे प्रात्यमिक कुंजीरवडी येथील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन त्यांच्या उपस्थितीत करुन दाखवण्यात आले.प्रात्यक्षिकावेळी शेतकऱ्यांना किटकनाशकांचे महत्व सांगण्यात आले. किटकनाशके फवारणीमुळे विविध रोग, किडींचा प्रादुर्भाव तुलनेने कमी होतो. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार पिकांवरती औषध फवारणी करण्याचे आणि विद्यापीठाचे वार्षिक कृषिदर्शनी वापरण्याचे आवाहन यावेळी कृषिदुतांनी उपस्थितांना केले.

अशी माहिती शेतकऱ्यांना देत असतानाच मुलांनी पिकांवर कोरोपाइरीफॉस व बाविस्टीनची फवारणी करून दाखविली.प्रात्यक्षिकाचे आयोजन कृषिदुतांमध्ये आफताब आतार, सुरज बदे, अथर्व औटी, संभाजी भोसले,तुषार भोसले,शुभम चौगुले, प्रज्वल जाधव, गणेश चंदनकर, शंभूराजे बुधवंतराव,रोहन चव्हाण,सोमेश अजबे ,रोहन आढाव ,यांनी केली. उपस्थित शेतकऱ्यांच्या सहकार्याबद्दल कृषिदुतांनी त्यांचे आभार मानले.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविदयालयाचे सहयोगी अधिष्ठाता मा. डॉ. एस. डी. मासाळकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. व्ही.जे.तरडे व केंद्र प्रमुख डॉ. आर. डी. बनसोड, कार्यक्रम अधिकारी डॉ.जे.एस.कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here