कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ) यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन.
माजी खासदार स्व.कर्मयोगी शंकररावजी बाजीराव पाटील (भाऊ ) यांच्या 17 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील कर्मयोगी भाऊंच्या समाधीचे दर्शन घेऊन राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अभिवादन केले.
कर्मयोगी शंकररावजी पाटील यांचा जीवन प्रवास इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी आदर्शवत असून इंदापूर तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक ,आर्थिक क्षेत्रात त्यांचे मोठे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
यावेळी मोठ्या संख्येने कर्मयोगी परिवाराने भाऊंच्या समाधीचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन करीत कर्मयोगींच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. समाधी स्थळावर नारायणदास रामदास संगीत विद्यालयाच्या भजनी मंडळाने भजन गायले.
राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना काही दिवसापूर्वी हॉलीबॉल उद्घाटना दरम्यान हॉलीबॉल खेळताना पायाला दुखापत झाली आहे. आज ते व्हीलचेअरच्या साह्याने समाधी स्थळापर्यंत आले व सहकाऱ्यांच्या समवेत त्यांनी कर्मयोगी भाऊंना विनम्र अभिवादन केले.
निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजपा युवा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील तसेच विविध संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते ,प्राचार्य ,उपप्राचार्य , शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी यांनी कर्मयोगी भाऊंच्या समाधीचे दर्शन घेऊन अभिवादन केले.
Home Uncategorized कर्मयोगी भाऊंचा जीवनप्रवास तालुक्याच्या विकासासाठी आदर्शवत असून आर्थिक क्षेत्रात त्यांचे मोठे महत्त्वपूर्ण...