श्रावणी यात्रेनिमित्त श्री.नंदिकेश्वरास दुग्धाभिषेक संपन्न..
इंदापूर: निरा नदीवर वसलेले श्री क्षेत्र नंदिकेश्वर मंदीर हे अतिशय पुरातनकालीन असुन या देवस्थानची फार मोठी आख्यायिका आहे.त्यामुळे नंदिकेश्वर मंदीर परिसरामध्ये लवकरच निरा नदीवर घाट बांधणीचे काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.आज श्री.नंदिकेश्वर यात्रेनिमित्त आ.दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते नंदिकेश्वरास दुग्धाभिषेक घालण्यात आला,यावेळी ते बोलत होते.श्री.भरणे म्हणाले की,आपल्या तालुक्यामध्ये अनेक प्रसिद्ध देवस्थाने असून यामध्ये निरवांगी येथील श्री. नंदिकेश्वर मंदिर हे एक प्राचीन शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेले व हजारो भाविक भक्तांची श्रद्धा असलेले मंदिर आपल्या इंदापूर तालुक्याच्या वैभवात भर घालत आहे.त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने एक नैसर्गिक देणं या परिसराला लाभली असल्याने लवकरच नीरा नदीवर अतिशय भव्यदिव्य असा घाट बांधण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.तसेच पुढे बोलताना आमदार भरणे यांनी सांगितले की यापूर्वीही मंदिराच्या विकासासाठी आपण वेळोवेळी निधी दिला असून भविष्यातही या मंदिराचे जतन व संवर्धन करण्यासाठी तसेच परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी पाहिजे तेवढी मदत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.तसेच नीरा नदीवर आपल्या तालुक्यामध्ये जवळपास ९.५ कोटी रुपयांचे बंधारे मंजूर झाले असून लवकरच या परिसरातील पाण्याचा प्रश्न सुद्धा बऱ्यापैकी सुटणार असल्याचेही ते म्हणाले.त्याचबरोबर या यात्रेच्या निमित्ताने मंदिर परिसरामध्ये मंजूर झालेल्या प्रामुख्याने मंदिर प्रांगणामध्ये पेव्हर ब्लॉक बसवणे व रासकर वस्ती येथे सिमेंटकाँक्रीटचा रस्ता तयार करणे या कामांचा भूमिपूजन समारंभ आ.दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते पार पडला.या वेळी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यासह जेष्ठ नेते प्रतापराव पाटील,जिल्हा नियोजन समितीचे मा.सदस्य सचिन सपकळ,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे,मार्केट कमिटीचे माजी संचालक सचिन देवकर,बबन रासकर,सरपंच संजय केसकर, बबनराव रासकर, रामभाऊ रासकर, शिवाजी रासकर,महादेव कवितके, विठ्ठल पवार,रणजीत रासकर,समिर पोळ,विलास रासकर,दादा काळे,दादा सुळ,विष्णू काळे,राहुल गोरे, सचिन रासकर यांच्यासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते