रमेश चंदुलाल शुक्ल एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशन इंदापूर च्या वतीने माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साधू वासवानी मिशन संचलित के. के. आय. इन्स्टिट्यूट इनल़ँक बुधरानी हॉस्पिटल पुणे तसेच खोपोली येथील सुप्रसिद्ध माधवबाग यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे रविवार दि. 10 सप्टेंबर 2023 रोजी कासारपट्टा येथील नामदेव मंदिरात करण्यात आले.सदर कार्यक्रमाचे आयोजन ॲड.राकेश शुक्ल आणि अजय ग्रुप इंदापूर यांच्यावतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले तसेच निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व युवा नेते राजवर्धनदादा पाटील आणि अकलूज येथील सुप्रसिद्ध अश्विनी हॉस्पिटलचे डॉ. एम के इनामदार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमात पद्माताई भोसले यांचा सत्कार श्रीमती शोभा दुबे यांनी केला तर राजवर्धन दादा पाटील यांचा सन्मान माणिक शुक्ल यांनी केला.कार्यक्रमाचे सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.पद्माताई भोसले यांनी आपल्या मनोगतामध्ये कै. रमेशकाका शुक्ल आणि कर्मयोगी शंकरराव पाटील उर्फ भाऊ यांच्या आठवणींना उजाळा दिला. दिवसेंदिवस समाजात असे कार्यक्रम घेतले पाहिजेत, समाजकार्याचा वसा समाज घटकांनी उचलला पाहिजे असे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
राजवर्धन पाटील यांनी आपल्या मनोगतात सर्वांचे प्रेरणास्थान आणि इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुक्यात झालेल्या विविध कार्यक्रमा विषयीची माहिती दिली तसेच या आरोग्य तपासणी शिबिराचा जास्तीत जास्त लोकांनी फायदा घ्यावा असे आवाहन केले.
डॉ. एम के इनामदार यांनी कै. रमेश काका शुक्ल यांची राजकीय कारकीर्द मला अवगत होतीच, त्याप्रमाणेच त्यांची मुलेही समाजकार्यात आपला ठसा उमटवत आहे त्यांच्या कार्यास माझ्या शुभेच्छा अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमात नगरसेवक कैलास कदम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. राकेश शुक्ल यांनी केले.सचिन शुक्ल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्रा. अमित दुबे यांनी सर्वांचे आभार मानले.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय ग्रुपचे अमित सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, राहुल सावंत, ॲड.सोहम घोडके, गोविंद बांबळे, विनोद शुक्ल, अक्षय क्षीरसागर, विनोद शिंदे, मोहन शुक्ल, आनंद शुक्ल ,यश जाधव, , प्रितेश जाधव, हैदर शेख, उंबरे, ओंकार जामदार, कृष्णा सुतार, प्रसाद माने, सचिन शिरसागर, अमित दुबे, विशाल शुक्ल, अमोल मखरे, सतीश तारगावकर यांनी परिश्रम घेतले.
Home Uncategorized माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रमेश चंदुलाल शुक्ल एज्युकेशनल अँड सोशल...