हर्षवर्धन जी पाटील साहेब रखरखत्या उनाचा, कोसळणाऱ्या पावसाचा आपण कधी विचार केला नाही. जोमानं, जबाबदारीनं आपलं काम करत राहिला. विरोधी नेत्यांनी, समाजातील विकृत लोकांनी आपल्याला कायम बदनाम करण्याचा, कमजोर करण्याचा प्रयत्न केला पण आपण किंचितही ढळला नाही. राजकारण हा सज्जनाचा खेळ नाही, राजकारण हे बदनामीचे साधन होत असतानाच आपण मात्र यांची परिभाषा बदलण्याचा प्रमाणिक प्रयत्न केला. तालुक्यातील जनतेने आपल्याला कधीच नाकारले नाही, मताचे भरभरून पारडे आपल्या ओंजळीत कायम टाकले आहे. जनतेच्या मनातला आमदार म्हणून आज ही तो आपला मान कायम राहिला. सातत्याने लोक संपर्कात राहून आपले नेतृत्व या मातीत आपण अजून घट्ट केले. पक्षाने, आपल्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडली. आपल्यावर किती ही टिका झाली तर आपले संतुलन कधीच ढळू न देता आपण कायम जबाबदार राजकारणी म्हणून काम करता याचं कायम कौतुक आहे. प्रचंड मनस्ताप, कष्ट आपल्या वाट्याला आले.पण आपण मात्र आपल्या विचारांशी, जनतेच्या विश्वासाशी कधीच गद्दारी न करता लढत राहिला. आता बघता बघता विधानसभा निवडणूक लागेल, तेव्हा जनता उत्साहाने आपल्या पाठीशी उभा राहताना दिसेल. हुशार, अभ्यासू, प्रत्येक विषयावर मजबूत पकड असणारे आपले नेतृत्व मुंबईच्या विधानसभेत इंदापूरचा आवाज गाजवताना पुन्हा एकदा दिसेल.आता माघार नाही तर आरपारच्या लढाईत आपला पर्याय शंभर टक्के यशस्वी होईल हा जनतेचा विश्वास आहे…
साहेब पुन्हा एकदा यशस्वी व्हायचंय…. वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!
शुभेच्छुक:
१) अक्षय गांधले अंकिता ताई समर्थक पळसदेव.
२) मनोज मोरे आणि मित्रपरिवार इंदापूर