आ.दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शुक्रवारी ग्रामपंचायत वडापुरी अंतर्गत २० कोटी ७० लाखाच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन..

इंदापूर: ग्रामपंचायत वडापुरी अंतर्गत तब्बल २० कोटी ७० लाखाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून यावेळी जाहीर सभाही आयोजित केली आहे. वीस कोटी सत्तर लाखाच्या या विकास कामांमध्ये प्रामुख्याने पानंद रस्ते, सभामंडपे निधी, शौचालये, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या, दलित वस्ती सुधारणा अंतर्गत काँक्रिटीकरण,नागरी सुविधा अंतर्गत खडीकरण, रस्ते दुरुस्ती, जलजीवन प्राधिकरण नळ पाणीपुरवठा, मुस्लिम बांधवांसाठी कब्रस्थान,बुद्धविहार अशा सर्व समावेशक कामाचे भूमिपूजन व उद्घाटन यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते होणार आहे.माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणून एक विक्रम प्रस्थापित केला आहे.महाराष्ट्रात सर्वात जास्त निधी आणण्याच्या विक्रमामध्ये इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांचा दुसरा नंबर लागतो…राष्ट्रवादीचे अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा ब्रेक न घेता पुन्हा एकदा जोमाने इंदापूर तालुक्यात विविध विकासकामांचा धडाका आमदार दत्तामामांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आणि याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी इंदापूर तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वडापुरी या गावात तब्बल २० कोटी ७० लाखाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन होणार आहे. सदरचे उद्घाटन कार्यसम्राट आमदार दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते होणार असून तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमांमध्ये सन्माननीय उपस्थिती म्हणून ज्येष्ठ नेते हनुमंतराव जगताप, तय्यब शेख,बाबुराव जगताप,शिवाजी तरंगे,अशोक फडतरे,दयानंद चंदनशिवे,भागवत काटकर,महेंद्र काळे,दादासो जगताप,महेंद्र काटकर,प्रताप बागल,आप्पासो बंडगर,सोमनाथ पवार,केशव पिंगळे,किरण पासगे यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे.
या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन भारत चंदनशिवे, बाबुराव चंदनशिवे, पांडुरंग चंदनशिवे, विठ्ठल कदम, शौकत शेख, फिरोज शेख, तुषार चंदनशिवे सुरेश चंदनशिवे, सुनिल पिंगळे, सुनिल कोकरे, किशोर देवकर, मारुती पासगे, बालाजी पासगे, दत्तात्रय शिंदे, विजय बागल, कमलादास कांबळे, संतोष पासगे, अशोक पासगे, ऋषिकेश चंदनशिवे, दत्तात्रय ढोबळे, शब्बीर शेख यांनी केले आहे.त्यामुळे या कार्यक्रमाला आपण उपस्थित रहावे असे आवाहन सरपंच संगीताताई तरंगे,ग्रामसेवक नंदराज चंदनशिवे, ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग पिंगळे,रेखा करगळ,सतिश फडतरे,शोभा बागल,वैशाली खामगळ,गणेश चंदनशिवे,अश्विनी गायकवाड,अंबिका बागल,संगिता पासगे,अमोल पवार या सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here