श्री नारायणदास रामदास हायस्कूल व ज्यु कॉलेज, इंदापूर येथे इयत्ता दहावी २००३-०४ व बारावी २००५-०६ च्या माजी विद्यार्थी-विद्यार्थींनी व शिक्षक-शिक्षिका समावेत स्नेहसंमेलनचा कार्यक्रम रविवार दिनांक १२ ऑगस्ट २०२३ रोजी पार पडला. सकाळी १० ते दुपारी ३ वाजे पर्यंत हा कार्यक्रम चालला. अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मा. संजय सोरटे सर होते. मा घाडगे सर, खुसपे सर, गुजर सर, दास सर, चव्हाण सर, नागटिळक सर, देवकर सर, वाघमोडे सर, गांधले सर, दिक्षित सर, वणवे मॅडम, कुदळे मॅडम, घाडगे मॅडम, खेडकर मॅडम, असे अनेक निवृत्त झालेले शिक्षक-शिक्षिकांनी स्नेहसंमेलनाला उपस्थिती लावली. सोबत सध्या शाळेमध्ये कार्यरत असलेले माळी सर, झगडे सर, क्षीरसागर सर, तावरे सर, हुबाळे सर, केवारे सर, देवकर मॅडम, शेख मॅडम, इत्यादी उपस्थित होते. यासोबत मुंबई, पुणे, बारामती, सांगली अनेक शहरातुन अनेक माजी विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थिती लावली होती. यामध्ये सरकारी अधिकारी-कर्मचारी, उद्योजक-उद्योजिका, नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी करणारे, व्यापारी मित्र-मैत्रिणीं, प्रगशील बागायतदार शेतकरी, पत्रकार मित्र व माजी विद्यार्थी-विद्यार्थींनी उपस्थित होते. यावेळी शाळेला माजी विद्यार्थी-विद्यार्थीं तर्फे इयत्ता ९-१० वी व ११-१२ वी च्या विद्यार्थी-विद्यार्थींनी उपयोगी येतील अशी एकूण २२१ पुस्तके भेट दिली. सोबत माजी विद्यार्थी-विद्यार्थीं १९ वर्षांनी शाळेत भेटले म्हणून शाळेने मागणी केल्याप्रमाणे १९ झाडे भेट दिली. काही दिवसांमध्ये निवृत्त होणारे तावरे यांना शुभेच्छा दिल्या. इंदापूर शहरातील श्रीराम मंदिर येथील श्रावणबाळ आश्रमचे अध्यक्ष मा. विशाल करडे यांच्या अन्नादानासाठी भेट दिली. स्नेहसंमेलनाच्या दरम्यान अल्पोपाहार आणि जेवणाची सोय केली होती. यावेळी अनेक शिक्षक-शिक्षिकांनी आपल्या आठवणी, अनुभव सांगितले व मार्गदर्शन केले. यामध्ये मा खुसपे सर, चव्हाण सर, नागटिळक सर, देशपांडे मॅडम, भालेराव मॅडम, कुदळे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अॅड निहाल शेख, आसिफ बागवान, मनोज पवळ, आशिष बर्गे, योगशिक्षका मा संपदा गलांडे, शुभांगी शिंदे, डॉ आश्विन कवितके या माजी विद्यार्थ्यी-विद्यार्थीनी मनोगते व्यक्त केली. या व्यतिरिक्त सर्व उपस्थित माजी विद्यार्थी-विद्यार्थींनी आपली ओळख करून दिली. मा सोरटे सर यांनी अध्यक्षीय भाषण केले. मा आशिष साळुंके यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन मा संतोष नरुटे यांनी केले.