आ.भरणेमामा पुन्हा ॲक्शन मोडमध्ये.. तब्बल 29 कोटी रुपयाच्या कळंब नळ पाणीपुरवठा योजनेचा उद्या भूमिपूजन समारंभ…

इंदापूर: उद्या रविवार दिनांक 06 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9 वाजता जलजीवन मिशन अंतर्गत इंदापूर तालुक्यातील कळंब येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप आबा पाटील, राष्ट्रवादीचे इंदापूर तालुकाप्रमुख हनुमंत आबा कोकाटे, नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ उपस्थित राहणार आहेत.तब्बल 29 कोटी रुपयाची ही नळ पाणीपुरवठा योजना असणार आहे. यापूर्वीही इंदापूर तालुक्यातील अनेक नळ पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन आमदार भरणेमामा यांनी केले असून आता प्रत्येकाच्या घरात स्वच्छ पाणी देण्याचा निर्धार आहे यातूनच गोरगरीब महिलांच्या डोक्यावरचा हंडा कमी करण्याच्या दृष्टीने ही योजना फायदेशीर राहील असे अनेक वेळा भरणे मामांनी बोलून दाखवली आहे. इंदापूर तालुक्यात गावोगावी व खेडोपाडी रस्त्याचे जाळे विणल्यानंतर आता गावोगावी नळ पाणीपुरवठा योजने अंतर्गत घरोघरी नळ कनेक्शन देण्याचा निर्धार केला आहे असे आमदार भरणे यांनी सांगितले.सदरचा कार्यक्रम हा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित केला असून उद्या या होणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे आवाहन कळंब गावच्या कर्तबगार महिला सरपंच विद्याताई अतुल सावंत यांनी केले आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here