अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आमदार दत्तात्रय भरणे यांनी केला निधीचा श्रीगणेशा..तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी ३७ कोटींचा निधी मंजूर…

इंदापूर:उपमुख्यमंत्री अजित पवार सरकारमध्ये सामिल झाल्यापासून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे हे पुन्हा एकदा कमालीचे ॲक्शन मोडवर आले असून कालच त्यांनी अजित पवारांकरवी जलसंधारण विभागाच्या ५० कोटी निधीच्या विकासकामांची स्थगिती ऊठवून सत्तेतील त्यांची पॉवर दाखवली असतानाच या कामाला २४ तासही उलटत नाहीत तोच आजपासून सुरू झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये आमदार भरणे यांनी पहिल्याच दिवशी इंदापूरसाठी निधी खेचण्यास सुरुवात केली असून तालुक्यातील विविध रस्त्यांसाठी सुमारे ३७ कोटी मंजूर करून आ.भरणे यांनी निधीचा श्रीगणेशा केला आहे.याविषयी बोलताना आमदार भरणे म्हणाले की,आपण इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटींचा निधी आणला असून प्रत्येक वाडी-वस्तीवर विकासाची गंगा पोहचवली आहे.तरीसुद्धा निधीच्या बाबतीत मी समाधानी नसून तालुक्यातील थोडा-बहुत राहिलेला विकासाचा अनुशेष भरून काढल्याशिवाय आपण गप्प बसणार नसल्याचे सांगून ते म्हणाले की,अजुन काही भागातील नागरिकांची रस्त्याच्या कामाची मागणी होती,या नागरिकांच्या मागणी दखल घेत येणा-या अर्थसंकल्पात तुमचा रस्ता मंजूर केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द गावकऱ्यांना दिला होता.त्यास अनुसरून उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागणीमध्ये ३७ कोटींचा निधी मंजूर केला आहे.यामध्ये
१.वरकुटे खुर्द पिटकेश्वर घोरपडवाडी मार्गाची सुधारणा करणे( बिजवडी जोडमार्ग ते बारामती इंदापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 965)रस्ता करणे- 4 कोटी 50 लाख
२.लासूर्णे ते कळंब रस्ता करणे-10 कोटी
३.बावडा ते निरनिमगाव जिल्हा हद्दीपर्यंत रस्ता करणे – 9 कोटी
४.अकोले ते बोरी रस्ता करणे – 1.5 कोटी
५.टण्णु ते चव्हाण वस्ती बंधारा ते गावठाण रस्ता करणे – 4 कोटी
६.वालचंदनगर सराफवाडी रेडा शहाजीनगर भोडणी रस्ता करणे -4 कोटी
७.सणसर ते रायते मळा खटके वस्ती रस्ता करणे – 4 कोटी
या ३७ कोटी रूपयांच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याचे भरणे यांनी सांगितले आहे.तसेच
पुरवणी अर्थसंकल्प यादीमध्ये इंदापूर तालुक्यातील दळणवळणच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला डाळज नं.2 ते कळस जंक्शन वालचंदनगर ते नीरा नदी पुणे जिल्हा हद्द या रस्त्याच्या डिपीआर साठी 3कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आली असून हा रस्ता जवळपास 26 किमी चा असल्याने लवकरच या रस्त्याला सुध्दा भलामोठा निधी मिळणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here