संत- महंतांनी अखंड मानवजातीला जगण्याचा मार्ग दाखवला- माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

निमगाव केतकी येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन,आ.भरणे यांच्या कडून २५ लाख निधीची घोषणा.
निमगाव केतकी:आपला महाराष्ट्र ही साधू-संतांची भूमी असून त्यांनी दिलेली शिकवण आपण आत्मसात केल्यास प्रत्येकाचे जगणं समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही,हा विश्वास माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निमगाव केतकी येथे बोलताना व्यक्त केला.
आज निमगाव केतकी ता.इंदापूर येथे संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी आमदार भरणे बोलत होते.या प्रसंगी त्यांनी संत शिरोमणी सावता माळी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मनोभावे दर्शन घेतले.तसेच उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले की,आपल्या महाराष्ट्राला साधू-संतांचा खूप मोठा अध्यात्मिक वारसा लाभला असून संत-महंतांनी अखंड मानवजातीला जगण्याचा मार्ग दाखवला असल्याचे सांगत या ठिकाणी गेल्या ३३ वर्षांपासून निमगावकरांनी अविरतपणे अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा सुरू ठेवल्या बद्दल त्यांनी उपस्थितांचे आभार मानले.त्याच बरोबर संत सावता माळी मंदिर परिसरात आपण अनेक विकासकामे केली असून उर्वरित विकासकामांसाठी सुद्धा लवकरच तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातून २५ लाख रूपये निधी देण्याची घोषणा श्री.भरणे यांनी केली.या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रविण माने,पंचायत समितीचे माजी सभापती अंकुश जाधव,सचिन सपकळ,पांडुरंग हेगडे,रतन हेगडे,तात्यासाहेब वडापूरे,बबन खराडे,संदिप भोंग,सचिन राऊत,संतोष राजगुरू यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here