सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ति |
रखुमाईच्या पती सोयऱिया ||
गोड तुझे रूप गोड तुझे नाम |
देई मज प्रेम सर्वकाळ ||
विठो माऊलिये हाच वर देई |
संचरोनि राही हृदयामाजी ||
तुका म्हणे कांही न मागे आणिक
तुझे पायी सुख सर्व आहे || ढुकेेवस्ती: दिनांक २४ जून २०२३ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढुकेेवस्ती येथे पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये अंगणवाडी ते इयत्ता ८ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शाळेच्या परिसरात श्री ज्ञानेश्वर महाराज दिंडी काढण्यात आली त्यामध्ये मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिंडीमध्ये पालखीची सजावट करून पालखीसोबत सर्व विद्यार्थी ज्ञानोबा —— माऊली—- तुकाराम– — जयघोष करत होते.पालखी सोहळ्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान केला होता,त्यामध्ये मुलांनी पांढरा नेहरू कुर्ता गळ्यामध्ये टाळ, कपाळाला गंध, हातात भगवी पताका व मुखी माऊली माऊली हा जयघोष चालू होता.मुलींनी पारंपारिक पद्धतीने मराठमोळी वस्त्र परिधान करून डोक्यावरती तुळस घेऊन हरिनामाचा गजर केला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सतीश ढुके,सरपंच श्री. चांगदेव ढुके व श्री.नरहरी काळे यांच्या हस्ते पालखीची पूजा व आरती केली. आरतीसाठी सर्व ग्रामस्थ तसेच पालक वर्ग उपस्थित होते.पालखी दिंडी सोहळा शाळेच्या परिसरात फिरून आल्यावर शाळेच्या मैदानावरती गोल रिंगण घेण्यात आले, त्यामध्ये पालखी, झेंडेकरी विद्यार्थी, विणेकरी विद्यार्थी, तुळशी डोक्यावरती विद्यार्थिनींचे रिंगण झाले.त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.सर्व ढुकेवस्तीचा परिसर विठ्ठलमय गजराने घुमत राहिला.इहलोकी पालखी सोहळा यापेक्षा कोणताही सोहळा जगभरात मोठा नाही.दैदीप्यमान, नेत्रदीपक सोहळा, डोळ्याचे पारणे फेडणारा, ऊर भरून आणणारा होता.
Home Uncategorized भक्तिमय वातावरणात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढुकेवस्ती येथील चिमुकल्यांचा रंगला पालखी सोहळा…