पळसदेव: गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एल.जी.बनसुडे इंग्लिश मिडियम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज पळसदेवमध्ये दिनांक २८ जून २०२३ रोजी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये नर्सरी ते इयत्ता बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शाळेच्या परिसरात श्री ज्ञानेश्वर महाराज दिंडी काढण्यात आली त्यामध्ये मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दिंडीमध्ये पालखीची सजावट करून पालखीसोबत संत परंपरेतील विविध संतांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांनी परिधान केल्या होत्या. त्यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, संत तुकाराम इत्यादी संतांच्या वेशभूषा करून पालखी सोहळ्याची शोभा वाढवली होती.सर्व विद्यार्थी ज्ञानोबा —— माऊली—- तुकाराम– –जयघोष करत होते. पालखी सोहळ्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी वारकरी पोशाख परिधान केला होता, त्यामध्ये मुलांनी पांढरा नेहरू कुर्ता गळ्यामध्ये टाळ, कपाळाला गंध, हातात भगवी पताका व मुखी माऊली माऊली हा जयघोष चालू होता.मुलींनी पारंपारिक पद्धतीने मराठमोळी वस्त्र परिधान करून डोक्यावरती तुळस घेऊन हरिनामाचा गजर केला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत नाना बनसुडे व संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ नंदाताई बनसुडे या दाम्पत्यांनी पालखीची पूजा व आरती केली.आरतीसाठी संस्थेचे सचिव नितीन बनसुडे तसेच पालक वर्ग उपस्थित होते.पालखी दिंडी सोहळा शाळेच्या परिसरात फिरून आल्यावर शाळेच्या मैदानावरती गोल रिंगण घेण्यात आले, त्यामध्ये पालखी, झेंडेकरी विद्यार्थी, विणेकरी विद्यार्थी, तुळशी डोक्यावरती विद्यार्थिनींचे रिंगण झाले. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.सर्व एल.जी.बनसुडे स्कुलचा चा परिसर विठ्ठलमय गजराने घुमत राहिला.’इहलोकी पालखी सोहळा यापेक्षा कोणताही सोहळा जगभरात मोठा नाही. दैदीप्यमान, नेत्रदीपक सोहळा, डोळ्याचे पारणे फेडणारा,ऊर भरून आणणारा होता. यावेळी मालनताई बनकर,बाबा(आप्पा) बनसुडे, प्राचार्या-वंदना बनसुडे, मुख्याध्यापक राहुल वायसे , सर्व विभागाचे विभाग प्रमुख,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आदि उपस्थित होते.
Home Uncategorized गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एल.जी.बनसुडे इंग्लिश मिडियम स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये...