इंदापूर: इंदापूर तालुक्यातील महत्त्वाची ग्रामपंचायत समजली जाणाऱ्या निमगाव केतकी परिसरासाठी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून तब्बल 90 कोटी रुपयाच्या कामांची भूमिपूजन व उद्घाटन समारंभ उद्या निमगाव केतकी येथे होणार आहे.सरपंच प्रवीण डोंगरे यांच्या माध्यमातून गावात चौफेर विकासाची गंगा वाहत आहे त्यातच आता आमदार दत्तामामा भरणे यांनी 90 कोटी रुपयाचा निधी देत निमगाव येथील महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरवण्याचा प्रयत्न केला आहे.याबाबत सरपंच प्रवीण डोंगरे म्हणाले की,”इंदापूर तालुक्याचा चौफेर विकास हा फक्त आणि फक्त दत्तात्रय मामा भरणे यांच्यामुळेच झाला आहे.उद्या जल जीवन मिशन अंतर्गत रक्कम रुपये 90 कोटी 65 लक्ष या निधीच्या नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ उद्या बुधवार दिनांक 28/6/2023 रोजी सकाळी 9 वाजता इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय मामा भरणे यांच्या शुभहस्ते व तालुक्यातील विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेला आहे सदरच्या कार्यक्रमाचे ठिकाण लाईट बोर्ड शेजारी होणार आहे.तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे” असे आवाहनही सरपंच प्रवीण डोंगरे यांनी केले आहे.
Home Uncategorized आ.दत्तात्रय भरणे यांचा विकासकामांचा धडाका सुरूच.. निमगावकरांसाठी तब्बल 90 कोटी ६५ लाखाचा...