अकलूज येथील व्यापाऱ्यांसाठी विद्यानंद बँकेकडून खास ..’एक पाऊल.. स्वप्नपूर्तीकडे..’ अंतर्गत भव्य कर्ज शिबिर योजना..

विद्यानंद को-ऑपरेटिव्ह बँक अकलूज शाखेकडून अकलूज येथील व्यापारी बांधवांसाठी “एक पाऊल स्वप्नपूर्तीकडे” या अंतर्गत खास लोन शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांतर्गत व्यापाऱ्यांसाठी त्यांच्या उद्योग वाढीला चालना मिळण्याच्या हेतूने 3 लाखापासून ते 40 लाखापर्यंत तारणी स्वरूपातील कर्ज,सी.सी कर्ज वितरण करण्यात येणार आहेत.विद्यानंद सहकारी बँकेच्या अकलूज शाखेकडून दिलेल्या माहितीनुसार सर्व प्रकारच्या व्यावसायिकांसाठी ही योजना राबविण्यात येणार असून कर्ज वितरण करताना सदरच्या व्यापाऱ्याचा त्याच्या व्यवसायाच्या आर्थिक स्थितीची माहिती घेऊन त्याचप्रमाणे लोन वितरणासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे घेऊन त्वरित कर्ज मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.
विद्यानंद बँकेच्या ग्राहकांनी कर्जाची परतफेड रेगुलर केली आणि सी.सी रिन्यूअलकरिता कागदपत्राची ग्राहकांनी पूर्तता लवकर केल्यास 1 टक्का व्याजामध्ये सवलत मिळणार आहे. सदरचा व्याजदर हा अत्यल्प असून झटपट कर्ज मंजुरी होऊन व्यापाऱ्याला आपल्या व्यवसायामध्ये चालना मिळणार आहे. त्याचप्रमाणे या बँकेकडून खास डॉक्टर्सना दवाखाना बांधण्यासाठी व मशिनरी खरेदीसाठी अल्पदरात कर्ज वितरण केले जाणार आहे.त्यामुळे सर्व व्यापारी व वैद्यकीय क्षेत्रातील ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन विद्यानंद सहकारी बँकेकडून करण्यात आले आहे.अगदी अल्पावधीतच नावलौकिक मिळालेल्या विद्यानंद सहकारी बँकेचा कॅश देवाण-घेवाण वेळ हा संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत असून ही बँक कॅश भरण्याला कोणत्याही प्रकारचे छुपे चार्जेस लावत नाही. त्याचबरोबर इतर फायनान्शिअल कंपनींपेक्षा अगदी अत्यल्प दरात सोनेतारण कर्ज सुविधा उपलब्ध करून देत असल्याने विद्यानंद सहकारी बँक सध्या सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी ‘एक पाऊल स्वप्नपूर्तीकडे’ अशाच प्रकारचे काम करताना दिसत आहे…



सदरच्या शिबिराविषयी अधिकची माहिती घेण्याकरिता विद्यानंद सहकारी बँक शाखा अकलूज येथे समक्ष भेट द्या अथवा 9921695646, 9175409027 9130114455,9881361355 या क्रमांकावर संपर्क साधावा..



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here