इंदापूर तालुक्यातील परप्रांतीयांच्या माहितीची नोंद प्रशासनाने दप्तरी घ्यावी- शिवसेना शहराध्यक्ष अशोक देवकर.

इंदापूर: “इंदापूर तालुक्यातील परप्रांतीय लोकांची माहिती पोलीस दप्तरी असणे आवश्यक आहे. आमचा परप्रांतीयांना विरोध नाही पण पोलीस प्रशासनाने परप्रांतीयांची भाडेकरू पडताळणी मोहीम, परप्रांतीय संख्या त्यांचे नाव,गाव, आधार कार्ड,मोबाईल नंबर इत्यादी माहिती घेऊन ती दप्तरी ठेवणे आवश्यक आहे.” असे मत शिवसेना शहराध्यक्ष अशोक देवकर यांनी व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले की,”सध्या राज्यात विविध गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून भविष्यात हे प्रमाण आणखी वाढू शकते त्यामुळे स्थानिक परप्रांतीयांची माहिती पोलीस दप्तरी असल्यावर हे प्रमाण कमी होऊ शकते किंवा भविष्यात काही घटना घडली तर ती व्यक्ती शोधणे सोपे होईल यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रत्येक परप्रांतीय लोकांची नाव, गाव ,आधार कार्ड, मोबाईल नंबर त्याचप्रमाणे ती व्यक्ती कोठे काम करत आहे याविषयीची इथंबूत माहिती प्रशासनाने ठेवणे गरजेचे वाटते” असे मत अशोक देवकर यांनी व्यक्त केले.सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीयांचे आगमन झालेले असून हे प्रमाण वाढू लागलेले आहे.औद्योगिक कारखानदारी, खाजगी मोठमोठे व्यवसाय, अगदी शेती पूरक व्यवसायामध्ये सुद्धा सध्या हे लोक काम करत आहेत.पोलीस प्रशासनाला सहकार्याच्या भूमिकेतून घर/रूम भाड्याने देताना घर मालकाने सर्व ओळखपत्रे पोलीस स्टेशनला  देणे गरजेचे वाटत आहे याचबाबत पोलीस प्रशासनास भेटून लवकरच संबंधित निवेदन देणार आहे अशी माहिती अशोक देवकर यांनी सांगितली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here