“कोणत्याही राजकीय पक्षाचा त्या जागेच्या मालकीशी काहीही संबध नाही”- मेघ:शाम पाटील

इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्टची जागा ही ट्रस्टच्याच मालकीची – मेघ:शाम पाटील

इंदापूर : पूर्वीच्या काळी इंदापूर तालुक्यातील सर्वसामन्य जनतेला, तालुक्याच्या ठिकाणी बसण्या-उठण्याची सोय व्हावी म्हणून शहरात मध्यवर्ती ठिकाण कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ ) यांनी लोकवर्गणीतून सदर जागा घेऊन तेथे इमारत बांधली. सदर जागा ही काँग्रेस हे नाव असलेल्या देशातील अथवा राज्यातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या मालकीची केव्हाही नव्हती व नाही. सदर जागेचा कोणत्याही नोदणीकृत राजकीय पक्षाचा काही एक हक्क हितसंबंध नाही. सदरची जागा कोणाच्याही खाजगी मालकीची नसून ती इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर या नोंदणीकृत सार्वजनिक ट्रस्टच्या मालकीची आहे. या जागेचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी केला जात आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ) हे त्यावेळी कॉंग्रेस पक्षाचे नेते असल्याने ही इमारत कालांतराने काँग्रेस भवन या नावाने ओळखली जाऊ लागली. त्या जागेशी काँग्रेस किंवा इतर कोणत्याही राजकीय पक्षाचा काहीही संबंध नाही.
मा. धर्मादाय आयुक्त यांचे आदेशानुसार इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्ट, इंदापूर यांचा नावाची नोंद सरकार दप्तरी झालेली आहे. ह्या सर्व नोंदी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून झालेल्या आहेत. इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्ट या जागेचा व इमारतचा नागरपालिका कर, पाणीपट्टी, लाईट बिल आदी सर्व प्रकारचे वर्षानुवर्षे जमा करीत आहे. परंतु यामध्ये काही लोक चुकीच्या पद्धतीने जनतेची दिशाभूल करून गैरसमज निर्माण करत आहेत. तरी ही सर्व जागा व इमारत इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्टची आहे. अशी माहिती यावेळी ट्रस्टचे विश्वस्त मेघ:शाम पाटील यांनी दिली.
Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here