इंदापूर काँग्रेस कमिटीची भव्य इमारत झाली इंदापूर चॅरिटेबल ट्रस्टच्या नावावर…420 चा गुन्हा दाखल करणार – आमदार संजय जगताप यांची प्रतिक्रीया.

कर्नाटकात काँग्रेस जिंकली पण इंदापूरात काँग्रेस भवन वाचवण्यात काँग्रेसला अपयश…इंदापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसची भव्य अशी इमारत होती. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील काँग्रेसमध्ये असताना या इमारतीमध्ये सतत वर्दळ असायची. अनेक राजकीय उलथापालथीचे केंद्र ही इमारत ठरली असताना हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि इमारतीला उतरती कळा लागली.तदनंतर इमारती बाबत दावे प्रतिदावे सुरू झाले. यामध्ये इमारतीला लावलेले कुलूप तोडण्यासाठी काँग्रेसचे विद्यमान पुरंदरचे आमदार संजय जगताप पक्षाचा फौज फाटा घेऊन इमारत कुलूप मुक्त करण्यासाठी आले होते. परंतु हर्षवर्धन पाटलांच्या गनिमी काव्याने संजय जगताप यांना मोकळ्या हाताने परतावे लागले आणि प्रकरण धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे गेले. आता नुकतेच धर्मदाय आयुक्त कार्यालयाने याबाबत नाव बदलाचा आदेश दिला असल्याबाबतचे समजते. या आदेशावरून इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी चॅरिटेबल ट्रस्ट इंदापूर या नावे असलेली इमारत इंदापूर तालुका चारिटेबल ट्रस्ट इंदापूर ट्रस्ट मेघशाम वामनराव पाटील त्यांच्या नावे करण्याबाबत इंदापूर नगर परिषदेने जाहीर नोटीसीमध्ये प्रसिद्ध केले आहे. यामुळे इमारतीवरील काँग्रेसचा ताबा संपुष्टात आलेला दिसत आहे आणि भविष्यात येथे काँग्रेसचा झेंडा उतरून भाजपचा झेंडा दिसला तर आश्चर्य वाटायला नको.



आमचे काँग्रेस भवन ही चोरले या बाबत 420 चा गुन्हा दाखल करणार – आमदार संजय जगताप: याबाबत बोलताना जिल्हा पुणे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप म्हणाले की, सरकारने 1972 साली काँग्रेस पक्षाला पक्ष कार्यालयासाठी सदर इमारत व जागा दिली मात्र 2015 साली तत्कालीन काँग्रेस मधील असंतुष्ट लोकांनी इंदापूर तालुका काँग्रेस कमिटी चॅरिटेबल ट्रस्ट असा नावात बदल करून नोंद लावून घेतली. आणि पुढे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे दावा दाखल करून इंदापूर तालुका चारिटेबल ट्रस्ट असा नाव बदल आदेश घेतला. यामध्ये मोठी फसवणूक असून याबाबत 420 चा गुन्हा दाखल करणार आहे.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here