👉 इंदापूरकरांच्या थकबाकी कराबाबतच्या विषयात शिवसेनेची सकारात्मक उडी..
इंदापूर: आज दिनांक 24 मे रोजी इंदापूर नगरपालिका येथे इंदापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी राम कापरे यांना शिवसेनेच्या वतीने एक महत्त्वपूर्ण निवेदन देण्यात आले आहे. इंदापूर शहरातील थकबाकी करावरील व्याज हे माफ व्हावे आणि ते माफी होताना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ज्या पद्धतीने माफ करून सामान्य माणसाला दिलासा दिला आहे त्याच पद्धतीने इंदापूर नगरपालिकेने ही व्याजमाफी करून इंदापूरकरांना दिलासा द्यावा या आशयाचे निवेदन पुणे जिल्हा शिवसेना महिला संघटिका सीमा कल्याणकर, तालुकाप्रमुख महारुद्र पाटील, शहरप्रमुख अशोक देवकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेचे सीईओ राम कापरे यांना देण्यात आले.
याबाबत सीमा कल्याणकर यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की,”सदरचा विषय हा इंदापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला असून सध्या जादा प्रमाणात व्याज आकारल्याने इंदापूरकरांना हे जादाचे व्याज भरणे शक्य नाही त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर इंदापूरकरांना दिलासा मिळावा यासाठी आमचे नेते विजयबापू शिवतारे यांना भेटून आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय घेऊन जाणार आहोत व मुख्यमंत्री इंदापूरकरांना नक्कीच दिलासा देतील असा आमचा विश्वास आहे अशी माहिती जिल्हा संघटिका सीमा कल्याणकर यांनी दिली.गेल्या काही महिन्यापासून हा व इतर काही महत्त्वाचे विषय घेऊन इंदापूर नगरपालिकेच्या समोर ताटे सर, हमीद आतर,महादेव चव्हाण व इतर ग्रामस्थ आंदोलन करत आहेत आणि आता शिवसेनेने सुद्धा यामध्ये उडी घेतल्याने हा विषय लवकरात लवकर निकाली लागेल अशी इंदापूरकरांना आशा लागली आहे.सदरचे निवेदन हे संघटिका सीमा कल्याणकर,तालुकाप्रमुख महारुद्र पाटील,शहरप्रमुख अशोक देवकर,महिला तालुकाध्यक्ष रूपाली रासकर,महिला शहराध्यक्ष निर्मला जाधव,महिला शहर संघटिका ज्योती शिंदे, उप शहर संघटिका सोनम खरात यांच्या सहीने सदरचे निवेदन देण्यात आले.
Home Uncategorized इंदापूर नगरपालिकेच्या थकीत कराच्या व्याजमाफी बाबत शिवसेनेचे नेते शिवतारे बापू यांच्या माध्यमातून...