इंदापूर (प्रतिनिधी):
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १०१ वी पुण्यतिथी साठेनगर येथे युग प्रवर्तक श्री शाहू बहुद्देशीय सेवा संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरतशेठ शहा,मा.नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, ॲड.गिरीश शहा, सामाजिक कार्यकर्ते प्रा.अशोक मखरे, आर. पी.आय. जिल्हा सचिव शिवाजी मखरे, मातंग एकता आंदोलनाचे पुणे उपजिल्हाध्यक्ष ललेंद्र शिंदे युग प्रवर्तक श्री शाहू बहुद्देशीय सेवा संस्थाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, उपाध्यक्ष उत्तम गायकवाड , कार्याध्यक्ष संतोष जामदार ,सदस्य प्रवीण राऊत, सामाजिक कार्यकर्ते सुनील तळेकर यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला.दीपप्रज्वलन भरतशेठ शहा यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रतिमेचे पूजन ॲड.गिरीश शहा ,विठ्ठल ननवरे, प्रा.अशोक मखरे व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.लहुजी शक्ती सेनेचे पुणे जिल्हाअध्यक्ष दत्ता भाऊ जगताप तसेच दै.जनप्रवास इंदापूर तालुका प्रतिनिधी शिवाजी पवार यांच्या कडून मानवंदना देण्यात आली.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हमीद भाई आतार, ज्येष्ठ विचारवंत व लेखक प्रा.महादेव चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.मानव विकास परिषद महाराष्ट्र प्रदेश सचिव, इंदापुर पोलिस स्टेशन दक्षता समिती सदस्य रेशमा नौशाद शेख यांनीही महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
बहुजन वंचित आघाडी इंदापुर शहर च्या वतीने प्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला व त्यांच्याकडून मानवंदना देण्यात आली. ॲड.किरण लोंढे, ॲड.सूरज मखरे आदींनी मानवंदना दिली
मा.नगरसेवक दादासाहेब सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अनिल बाबा ढावरे , सुरेश ढावरे, चंद्रकांत सोनवणे,वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सुभाष खरे,आदींनी महाराजांना अभिवादन केले.आर. एन. बॉईजचे संस्थापक अध्यक्ष मयूर ढावरे , डॉ.अण्णा भाऊ साठे वाचनालयाचे अध्यक्ष उमेश ढावरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अभिवादन केले.कामगार नेते रमेश शिंदे, पै.मारुती शिंदे हे ही उपस्थित होते.