वैभव पाटील :प्रतिनिधी
दि. 6 मे रोजी सकाळी ठीक 9 वाजता राजर्षी शाहू महाराज पुण्यतिथी अभिनव विद्यालय विराथन येथे साजरी करण्यात आली. या वेळी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नेहा किणी मॅडम यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.या वेळी विद्यार्थ्यांनी शाहू महाराज विषयी माहिती सांगितली. तर आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक महेंद्र पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक करून शाहू महाराजाची महती सांगितली. तसेच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक वैभव पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन करून शाहू महाराजांचे गुण आचरण करण्याचे आवाहन केले.यावेळी शाळेचे पर्यवेक्षक बाबुराव भोईर शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते.शेवटी आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.