नातेपुते (ता.४) येथील चंद्रप्रभू एज्युकेशन सोसायटीचे, इंग्लिश मिडीयम स्कूल यावर्षी वार्षिक परीक्षेनंतर विद्यार्थ्याना सुट्टी देण्याऐवजी एप्रिल महिन्यात ‘ब्रीज कोर्स’ घेणार आहेत.
संस्थेचे चेअरमन नरेंद्र गांधी यांच्या संकल्पनेतून आणि सेक्रेटरी विरेंद्र दावडा, मुख्यध्यापिका शितल ढोपे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्याच्या कमाल अध्ययन क्षमातांच्या विकासासाठी या ब्रिज कोर्सचे आयोजन करण्यात आले आहे.
या ब्रीज कोर्स मध्ये पायाभूत अध्ययन कौशल्य वाढीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यामध्ये लेखन, वाचन, गणितीय आकडेमोड, हस्ताक्षर सुधारणा आणि इंग्लिश स्पीकिंग या पाच गोष्टीवर विशेष भर दिला जाणार असून विज्ञानवादी दृष्टिकोन , इंग्रजी हिंदी मराठी व्याकरण, ऐतिहासिक संकल्पना, भौगोलिक रचना व नकाशे, अवांतर वाचन, संगणकाची प्राथमिक माहिती, चित्रकला व क्राफ्ट, खेळातील गुणदर्शन, कथा कविता वर्णन या क्षमतांच्या विकासावर आधारित अध्यापन पद्धती निश्चित करण्यात आली आहे .
त्याचबरोबर इयत्ता दहावीचे उन्हाळी वर्ग आणि इयत्ता पाचवी व आठवी स्कॉलरशिपसाठी जादा तासिका सूरू राहणार आहेत. हा ब्रीज कोर्स विनाशुल्क असून बह्याशालेय विद्यार्थी यामध्ये सहभागी होवू शकतात. सदर वर्ग सकाळ सत्रांत सूरू राहतील. अशी माहिती शाळेचे शिक्षक संजय वलेकर यांनी दिली आहे.
Home Uncategorized विद्यार्थ्यांच्या पायाभूत अध्ययन कौशल्य वाढीसाठी चंद्रप्रभू स्कूल उन्हाळी सुट्टीत ‘ब्रीज कोर्स’ घेणार..