👉 जिल्हा नियोजन मंडळाकडून कामे मंजूर होण्याआधीच आमदारांकडून जनतेची दिशाभूल- अँड.शरद जामदार
👉 आमदारांकडून मागणीचे पत्र दाखवून श्रेयासाठी धडपड
इंदापूर : जिल्हा नियोजन मंडळाची अलीकडे बैठक झालेली नसल्याने काही विकास कामांना मंजुरी नसताना, इंदापूरचे आमदार हे मागणी केल्याचे फक्त पत्र दाखवून रु. 3 कोटी रक्कमेची कामे मंजूर केल्याचे श्रेय घेण्यासाठी जनतेची दिशाभूल करीत आहेत. सदरची कामे शिवसेना-भाजपचे युती सरकार मंजूर करणार व निधी देणार आहे. आता महाविकास आघाडीची सत्ता नसल्याने इंदापूरच्या आमदारांनी शिवसेना-भाजप सरकारच्या कामांचे फुकटचे श्रेय घेऊ नये, असे प्रत्युत्तर इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी शनिवारी दिले.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष, उच्च व तंत्रशिक्षण चंद्रकांतदादा पाटील हे जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचे नेतृत्वाखालील शिवसेना-भाजप सरकार हे जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून विकास कामांना मंजुरी देते. त्यामुळे फक्त मागणी केल्याचे पत्र हे सोशल मीडियावर व्हायरल करून व बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करून, फुकटचे श्रेय घेणे आमदारांनी आता बंद करावे. सत्तारूढ शिवसेना-भाजप सरकार हेच विकास कामांना निधी देणार असून, राष्ट्रवादीच्या आमदारांनी विकास कामांचे फुकटचे श्रेय घेऊ नये, असा टोलाही भाजपचे तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी लगावला. आता या सर्व प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस कडून काय स्पष्टीकरण होणार हे पाहण्याजोगे ठरेल.
Home Uncategorized इंदापूरच्या आमदाराचा कामांचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न,कामे मंजूर होण्याआधीच आमदारकडून जनतेची दिशाभूल-...