युवकांच्या सहभागातून इंदापूरसह बारामती लोकसभा मतदार संघात परिवर्तन अटळ- भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव दिपक अण्णा काटे.

👉 बारामती लोकसभा मतदारसंघात आज 52 शाखांचे ओपनिंग करत भाजपाचा धमाका, संध्याकाळी होणाऱ्या सभेवर महाराष्ट्राचे लक्ष.
इंदापूर:बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे आणि मिशन बारामती अंतर्गत भाजपाने हा मतदार संघ टार्गेट केला आहे आणि याचाच एक भाग म्हणून प्रचंड संघटन कौशल्य असलेले युवा नेतृत्व तथा भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे प्रदेश सचिव दिपक अण्णा काटे यांच्या माध्यमातून आज याच बारामती लोकसभा मतदारसंघात इंदापूर आणि बारामती तालुके व कर्जत तालुका मिळून 52 शाखांच्या उद्घाटनाचे नियोजन केलेले असून एकाच दिवशी 52 शाखा हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.
शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक अण्णा काटे हे शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यामुळे व आपल्या आक्रमकतेमुळे महाराष्ट्रात चर्चेत आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली इंदापूर मध्ये 34 शाखा व उर्वरित बारामती तालुक्यात शाखा आज स्थापन होणार आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे, दौंडचे आमदार राहुल कुल, आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, माजी आमदार बाळा भेगडे, आमदार राम शिंदे तसेच बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन समारंभ पार होणार आहेत.
याबाबत दिपक अण्णा काटे यांच्याशी बातचीत केली असता ये..तो.. ट्रेलर है… पिक्चर अभी बाकी है.. म्हणत येणाऱ्या पाच महिन्यांमध्ये सोलापूर,नगर, औरंगाबाद,सातारा, पुणे आणि सांगली या जिल्ह्यात भाजपा युवा मोर्चाचे संघटन वाढवणार असून याद्वारे शेकडो शाखा स्थापन करण्याचे नियोजन आहे असे दिपक अण्णा काटे म्हणाले.
इंदापूर तालुक्यात 34 शाखा ओपन करत भाजपाला या माध्यमातून शेकडो नवीन कार्यकर्ते मिळणार आहेत आणि यातूनच इंदापूर तालुक्यात हर्षवर्धन पाटील यांची ताकदही वाढणार आहे त्यामुळे दिपक अण्णा काटे यांच्या माध्यमातून संघटित होणारा युवा मोर्चाचा फायदा हर्षवर्धन पाटील यांच्या राजकीय कारकीर्द सुद्धा होणार आहे.त्यामुळे भाजपामध्ये एक आनंदाचे वातावरण आहे.आज दिग्गजांच्या उपस्थितीत इंदापूर मध्ये जी सभा होणार आहे ती रेकॉर्ड ब्रेक सभा होणार असून या सभेत इंदापूरसह बारामती लोकसभा मतदारसंघात परिवर्तनाची लाट दिसेल असा विश्वास दीपक अण्णा काटे यांनी यावेळी व्यक्त केला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here