- अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक व माथाडी कामगार नेते स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यस्मरण निमित्त अखिल भारतीय मराठा महासंघ भिगवण शाखेच्या वतीने भिगवण येथील छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालयाचे कार्यालयात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन भिगवण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक दिलीप पवार यांचे हस्ते पार पडले. पुणे जिल्हा जैन संघटनेचे अध्यक्ष सचिन बोगावत, भिगवण गावचे सरपंच प्रतिनिधी प्राचार्य तुषार सिरसागर, निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक पराग जाधव, मुस्लिम समाज बांधव सलीम सातारे, पत्रकार नितीन चीतळकर, भिगवण ग्रामपंचायतचे सदस्य जयदीप जाधव, सत्यवान भोसले, दत्तात्रय धवडे, मराठा महासंघाच्या इंदापूर तालुका महिला अध्यक्ष डॉ. पद्मा खरड, सचिव ऍड. ज्योती जगताप यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिबिराचे संयोजन अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ऍड पांडुरंग जगताप, इंदापूर तालुका अध्यक्ष राजकुमार मस्कर, इंदापूर तालुका युवक अध्यक्ष तुषार चव्हाण, भिगवण शाखाध्यक्ष छगन वाळके, भिगवण शहर युवक अध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी केले होते. या सर्वांनी रक्तदान करून शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदविला. हडपसर पुणे येथील अक्षय रक्तपेढीच्या माध्यमातून ५१ बाटल्या रक्त संकलित करण्यात आल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालय वैद्यकीय मदत कक्षाचे भिगवण येथील प्रमुख विशाल धुमाळ यांनी यावेळी दिली. शिबिर यशस्वी होण्याकरिता महासंघाचे डॉ. अजय थोरात, अशोक साळुंखे, भरत मोरे, रामचंद्र कदम, उमेश डिडवळ, सुनील काळे, सुभाष फलफले, दीनानाथ मारणे, दत्तात्रय जाधव, ग्रंथपाल दादा रणसिंग यांनी विशेष सहकार्य केले.