इंदापूर शहरासाठी आण्णाभाऊ साठे विकास कार्यक्रमांतर्गत रु. 3 कोटीचा निधी- हर्षवर्धन पाटील

इंदापूर : इंदापूर शहरासाठी भाजप शिवसेना युती सरकारने नगर विकास विभागाच्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी विकास कार्यक्रमांतर्गत रु. 3 कोटीचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांना दिली.सदर निधी मंजूर केलेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे हर्षवर्धन पाटील यांनी आभार व्यक्त केले. मंजूर कामे पुढील प्रमाणे – ) डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर मध्ये समाज मंदिराचा दुसरा मजला बांधकाम करणे
( रु. 91 लाख 34,800),
२) अविनाश मखरे घर ते गायकवाड घर ते पुणे-सोलापूर हायवे रस्ता बंदिस्त ड्रेनेज ओढयापर्यंत करणे (रु. 41 लाख 31,585 ),
) प्रभाग क्र.1 डॉ. आंबेडकर वसाहत विलास मखरे घर ते रामचंद्र मखरे घर पाथ वे करणे (रु. 11 लाख 83,796 ),(४) डॉ. आंबेडकरनगर व साठेनगर मधील स्मशानभूमी सुशोभीकरण करणे,(रु. 47 लाख 69,242), ) ज्योतिबा माळ स्मशानभूमी ते हनुमंत कांबळे घर ते विलास मखरे घर ते शिवाजी मखरे घरापर्यंत अंडरग्राउंड ड्रेनेज करणे (रु. 1 कोटी 07 लाख 79,478),
इंदापूर शहरामध्ये आपण सत्तेवर असताना नियोजनबद्ध पद्धतीने विकासकामे केल्याने शहराचा सर्वांगीण विकास झाला आहे. आगामी काळातील शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू दिली जाणार नाही, असे भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here