निरा डावा कालव्याचे पाणी येणारा कॅनॉल सणसर रायते मळा या ठिकाणी रात्रीच्या वेळी फुटल्यामुळे सणसर रायते मळा भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भारतीय युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी घटनास्थळी अधिकाऱ्यासोबत भेट देऊन झालेल्या नुकसानाची पाहणी केली.
कालच राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून सर्वांना योग्य ती शासकीय मदत मिळण्यासाठी सूचना केल्या होत्या.
राजवर्धन पाटील यांनी शेतकऱ्यासमवेत घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत व्हावी यासाठी आपण प्रयत्नशील राहणार आहे असे यावेळी राजवर्धन पाटील यांनी म्हटले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे संतोष चव्हाण, तानाजी उर्फ बाबा निंबाळकर व कार्यकर्ते उपस्थित होते.