“तातडीने दुरुस्ती व पंचनामे करा”- हर्षवर्धन पाटील यांच्या सणसर कालवा भगदाड संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना

हर्षवर्धन पाटील यांच्या सणसर कालवा भगदाड संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना
– तातडीने दुरुस्ती व पंचनामे करण्याच्या सूचना.
– भाजप पदाधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट.
इंदापूर : भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सणसर रायते मळा येथे सोमवारी रात्री निरा डावा कालव्याच्या मोरीला भगदाड पडून झालेल्या नुकसानीचे पंचनामे व दुरुस्ती संदर्भात जलसंपदाचे अधिकारी व महसूलच्या अधिकाऱ्यांना सोमवारी रात्री तसेच मंगळवारी सकाळी सूचना दिल्या.
हर्षवर्धन पाटील यांनी जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोरीच्या भगदाडातून वाहणारे पाणी इतरत्र वळवून पूर्णपणे थांबवावे व तातडीने दुरुस्ती सुरु करण्यात यावी, उन्हाळी हंगाम असल्याने आवर्तनात खंड पडू देऊ नये,अशा सूचना केल्या. तसेच तहसीलदार, प्रांताधिकारी यांच्याशी संपर्क करून नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्यात यावेत, अशा सूचना दिल्या.
दरम्यान, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे सूचनेनुसार भाजपचे पुणे जिल्हा सचिव तानाजी थोरात यांचेसह संग्रामसिंह निंबाळकर, लालासाहेब सपकाळ, बाबा निंबाळकर, प्रताप रायते, संतोष चव्हाण, मनोज पवार, सागर गुप्ते, काकासाहेब भाग्यवंत, मधुकर सरगर, बाळासाहेब नेवसे, माऊली नलवडे, महेश रायते, नागेश रायते, सुरेश खोपडे, कविराज निंबाळकर आदीसह भाजप कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळावरून तानाजी थोरात यांनी हर्षवर्धन पाटील यांना नुकसानीची माहिती दिली. तसेच याप्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित बारामती विभागाचे कार्यकारी अभियंता अश्विन पवार यांचेशी चर्चा केली.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here