सणसर गावातील रायतेमळा परिसरामध्ये ३९-ब फाट्याला काल मध्यरात्री अचानक भगदाड पडल्यामुळे कॅनालमधील पाणी मोठ्या प्रमाणावर शेतशिवारामध्ये गेल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले असुन या भागातील घरा-दारात,अंगणात सर्वत्र पाणी पसरले आहे.या अचानक झालेल्या आपत्तीमुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे.गावक-यांनी अक्षरशः अख्खी रात्र जागून काढली आहे.
या घटनेची माहिती मिळताच आमदार दत्तात्रेय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे यांनी सणसर परिसरामध्ये नुकसान झालेल्या भागाची त्वरित पाहणी करून तहसिलदार श्रीकांत पाटील यांच्याशी संपर्क साधत घडलेल्या घटनेची माहिती दिली. तसेच आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्याशीही संपर्क साधला. आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी तहसीलदार यांना त्वरित पंचनामे करण्याचा सूचना केल्या आहे.
यावेळी शेतक-यांनी झालेल्या नुकसानीची माहिती श्रीराज भरणे यांना देत असताना ऊस,गहू,डाळिंब,केळी,मका या सारख्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले.त्याच बरोबर पाण्याचा वेग जास्त असल्याने नागरीकांच्या घरांमध्ये पाणी गेल्याने संसारपयोगी साहित्याचे सुद्धा नुकसान झाले आहे.या पाहणीवेळी श्रीराज भरणे यांनी उपस्थितांना दिलासा देत आदरणीय मामांनी शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर पंचनामे करून तत्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रसासनाला निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे कोणीही खचून जावू नका,आम्ही सर्व तुमच्यासोबत असल्याचा विश्वासही यावेळी श्रीराज भरणे यांनी शेतकऱ्यांना दिला.यावेळी सरपंच पार्थ निंबाळकर, जलसंपदा अधिकारी यांच्यासह शेतकरी वर्ग उपस्थित होता.
Home Uncategorized सणसरमध्ये अचानक कालवा फुटल्याने शेतीचे प्रचंड नुकसान:श्रीराज भरणे यांनी केली पाहणी