इंदापूरच्या आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तालुक्याचे किती प्रश्न मांडले ? – ॲड. शरद जामदार

👉 ॲड. शरद जामदार यांचा आमदार भरणे यांना प्रश्न.
इंदापूर- इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तालुक्याचे किती प्रश्न मांडले ? किती प्रश्नांसाठी पाठपुरावा केला ? असा प्रश्न भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुका अध्यक्ष शरद जामदार यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांना केला आहे.
विरोधी पक्षाच्या आमदाराला शासन दरबारी किती किंमत असते हे जनतेला माहित आहे, त्यामुळे आ.भरणे यांनी आता निवांत घरी बसून विश्रांती घ्यावी, असा पलटवार इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अँड. शरद जामदार यांनी केला आहे.
मी इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी सक्षम आहे, विरोधकांनी त्याची चिंता करू नये, असा दावा आमदार भरणे यांनी केला. त्यास भाजपचे तालुकाध्यक्ष अँड. जामदार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
मी तालुक्याच्या विकासासाठी सक्षम आहे, अशा बाता मारणाऱ्या इंदापूरच्या आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तालुक्यातील किती प्रश्न मार्गी लावले, हे जनतेला सांगावे, असे आव्हान अँड शरद जामदार यांनी दिले.
राज्यातील शिवसेना-भाजप युतीचे सरकार हे गतिमान सरकार असून हे सरकार इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्यास कटीबद्ध आहे. शिवसेना भाजप युती सरकारने तावशी येथील नीरा नदीवरील पुलासाठी रु.17 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. शिवसेना-भाजप सरकारच्या माध्यमातून भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी कटीबद्ध आहेत, त्यांच्यामध्ये तेवढी धमक आहे. त्यामुळे आमदारांनी आता तालुक्याच्या विकासाची चिंता करू नये.आता विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे आ. भरणे यांनी निवांतपणे विश्रांती घ्यावी, असा टोला भाजपचे तालुकाध्यक्ष अँड.शरद जमदार यांनी लगावला.

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here