इंदापूर: 1910 क्लारा झेटकिन महिलेने जागतिक महिला दिनाची सुरुवात केली. त्यानुसार सर्वत्र महिला दिन उत्साहात साजरा केला जातो. इंदापूर नगरीतही गेली 21 वर्षापासून महिला दिन खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. यावर्षीही जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.यामध्ये इंदापूर नगरीतील मैत्रिणी ग्रुपने यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यामध्ये मंगळवार 7 मार्च रोजी आरोग्य शिबिर व आरोग्य विषयी महिलांना मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते.दिनांक 8 मार्च रोजी मुली व महिलांसाठी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या तसेच दिनांक 9 मार्च रोजी आनंद मेळावा भरवण्यात आला आहे यासाठी इंदापूर नगरीतील महिलांनी आपला भरघोस प्रतिसाद दर्शविला आहे आणि मोठ्या प्रमाणात सहभागी दाखवून दिला आहे.या कार्यक्रमातुन महिलांच्या एकजुटीची ताकद समजून आली या कार्यक्रमाचे आयोजन मैत्रिणीग्रुप तर्फे करण्यात आले होते यामध्ये मैत्रिणी ग्रुपचे अध्यक्ष अनुराधा गारटकर,हेमा बाब्रस,रेखा जोशी, हेमा माळुंजकर,उमा इंगोले,स्मिता पवार त्यांचे इतर अनेक सहकारी उपस्थित होते.