ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव राजे यांच्या वतीने महिलांची मोफत आरोग्य तपासणी

प्रतिनिधी:महेश सूर्यवंशी
देऊळगाव राजे, परिसरातील सर्व महिला ग्रामस्थांचे वजन, उंची रक्तदाब,रक्तातील साखर ,चरबीचे प्रमाण, थायरॉईड, प्रोटीन, यूरिक ॲसिड, लिव्हर व किडनी तपासणी व इतर तपासण्या करण्यात आल्या. सदर तपासण्या करण्यासाठी ठीक ठिकाणी जसे भैरवनाथ मंदिर,आडमाळ पुनर्वसन, खोसरे वस्ती,कड सूर्यवंशी वस्ती अशा विविध ठिकाणी सदर शिबिराचे कॅम्प आयोजन करण्यात आले होते. या मोफत आरोग्य शिबिरामध्ये 300 पेक्षा जास्त महिलांनी ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला.बक्षीसाचे वितरण 8 मार्च रोजी होणाऱ्या महिला मेळाव्यामध्ये करण्यात येणार आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश अल्लमवार त्यांची सर्व वैद्यकीय टीम,सरपंच, उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, यांनी विशेष असे सहकार्य केले तपासणी मध्ये सहभागी झालेल्या सर्व महिलांना हेल्थ कार्ड चे वाटप जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या महिला मेळावा मध्ये दिनांक 08 मार्च 2023 रोजी करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामविकास अधिकारी श्री.अमीर शेख यांनी दिली.



आरोग्य शिबिराचे आकर्षण:
शिबिरामध्ये तपासणीसाठी सासूबाईंना घेऊन येणाऱ्या सूनेस विशेष बक्षीसाची योजना ग्रामपंचायतीच्या सरपंच सौं स्वाती अमित गिरमकर व ग्रामपंचायत सदस्यांनी घोषित केली होती त्यास महिलांनी भरघोस असा प्रतिसाद दिला.



 

Google Ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here