ग्रामपंचायत सुरवड, प्राथमिक आरोग्य केंद्र बावडा व आरोग्य उपकेंद्र सुरवड यांच्या संयुक्त विद्यमाने आज सुरवड येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरास लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. यामध्ये मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी व इतर सामान्य आरोग्य तपासणी आदी तपासण्या केल्या. तसेच अनेकांना औषध गोळ्यांचे वाटप करण्यात आले. यामध्ये १७६ पुरुष,महिला व बालके यांच्या तपासण्या करण्यात आल्या. तर १५३ जणांचे एक्स-रे काढण्यात आले. या शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ताटे सर व डॉ. ज्ञानेश्वर बाहेगावकर सर यांनी विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले. तसेच सहदेव मोहिते वरिष्ठ औषधोपचार पर्यवेक्षक, रणजीत खेडकर वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, सागर शिंदे क्ष-किरण तंत्रज्ञ तसेच स्मीअर पॅथॉलॉजी टीम इंदापूर आदींनी ग्रामस्थांच्या तपासणी केल्या.या शिबिरासाठी कल्पना बुधावले आरोग्य सेविका, श्री. बाबासाहेब मोरे आरोग्य सेवक व आशा सेविका रूपाली पांढरे, सुलोचना बनसुडे, अर्चना माने, संगीता फलफले, सीमा तिकोटे आदींनी परिश्रम घेतले.तर सरपंच सौ.योगिता तुकाराम शिंदे, ग्रामसेवक प्रल्हाद आबनावे,सर्व सदस्य व कर्मचारी वृंद ग्रामपंचायत सुरवड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.