इंदापूर(उपसंपादक: संतोष तावरे): उद्या खा.सुप्रिया सुळेंनी वडापुरी गटात आपला नियोजित केला आहे. खरंतर या वर्षभरात सुप्रियाताईंनी इंदापूर तालुक्यावर विशेष लक्ष दिलेले दिसून येते.महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यात विकासगंगा आणली. इंदापूर तालुक्यातील रस्ते चकाचक केले. एवढेच नव्हे तर इंदापूर तालुक्यातील अनेक गावां-गावांना, वाड्या-वस्त्यांना जोडण्याचे कामही आमदार दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून झालेले अवघ्या इंदापूरकरांनी पाहिले आहे.परंतु याची दुसरी जर बाजू पाहिला गेलं तर इंदापूर तालुक्यात अवसरी-वडापुरी हा महत्वपूर्ण रस्ता गेले कित्येक वर्षापासून दुर्लक्षितच राहिला आहे त्यामुळे आता अवसरी वडापुरी रस्ता दुरुस्त करायचा राहिलाच कसा ? अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून होत आहेत. अवसरी-वडापुरी रस्त्याने गेल्यानंतर घरी गेल्यावर झेंडू बाम लावावा लागतो त्यामुळे या रस्त्याला संतप्त नागरिकांनी ‘झेंडू बाम’ रस्ता असे गमतीने नाव दिले आहे.या रस्त्यावरून ऊस वाहतूक व भांडगाव देवस्थान म्हसोबाला जाणारी वाहतूक सुद्धा मोठ्या प्रमाणावर होत असते. या रस्त्याला मोठमोठे खड्डे पडलेले आहेत त्यामुळे नागरिक, विद्यार्थी यांच्यासह सामान्य शेतकऱ्यांनाही याचा नाहक त्रास होत आहे. योगायोगाने सुप्रियाताई सुळे ह्या वडापुरी जिल्हा परिषद गटात दौऱ्यावर येणार आहेत. इतर गावांबरोबर त्या अवसरी या गावात सुद्धा जाणार असून अवसरी-वडापुरी या रस्त्यावरून त्या प्रवास करणार का? अशीच चर्चा रंगू लागली आहे.जरी त्या रस्त्याने गेल्या नाहीत तरी किमान या रस्त्याचे पाहणी करावी व या माध्यमातून रस्ता लवकर दुरुस्त व्हावा अशीच वडापुरी,अवसरीसह पंचक्रोशीतील लोकांची मागणी आहे. त्यामुळे नुुकतेच स्थानिकांनी दिलेले ‘झेंडू बाम रस्ता’ हे गमतीशीर नाव व याच गटात खासदार सुप्रियाताई सुळे यांचा या आठवड्यातील दुसरा दौरा हा एक योगायोग म्हणावा लागेल.